मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. ही धमकी मिळताच पोलिसांचा तात्काळ घटनास्थळी धाव घेतला होता.तसेच पोलिसांपाठोपाठ बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS)आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली असून सखोल तपासणी सूरू आहे.
दरम्यान क्राईम ब्रांचची टीमही तपासात सहभागी झाली आहे. या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि पोलिसांचा सतत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान उद्या गुढीपाडवा सण देखील या सणाच्या निमित्ताने परिसरात अलर्ट असणार आहे.
advertisement
या घटनेत नेमका धमकीचा हा ईमेल कुणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे.तसेच तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्याचा शोध लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
