मुंबईत झालेल्या गॅस तुटवड्यामुळे छोट्या छोट्या स्टॉल वाल्यांचे आणि मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबईकर गॅससाठी तासनतास एजन्सीबाहेर रांगा लावत आहेत.तर गॅस तुटवड्यामुळे मुंबईतले छोटे छोटे स्टॉल आणि खाऊगल्ल्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही प्रमाणात या गोष्टीचा फायदा हॉटेल मालकांना बसला आहे.त्यामुळे त्यांनी देखील हॉटेल बंद केले आहेत. गॅसची अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
advertisement
त्यात गॅस बुकींग संदर्भातही नियम बदलण्यात आले होते. शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसात गॅस वितरण करण्याचे नियम लागु करण्यात आले होते.त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची धाकधुक वाढली होती. तसेच गॅस तुटवड्याच्या भितीने अनेकांनी एजन्सीबाहेर रांगा लावायला सूरूवात केली होती. या गोष्टीचा फायदा घेऊन मालाडमध्ये एक टोळी सक्रिय झाली आणि ती ब्लॅकने दुप्पट किंमतीत सिलेंडर विकायची आणि काळाबाजार करायची.
या घटनेची माहिती मालाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड करण्यात आला आहे. तसेच 13 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केले आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून सुमारे 12 व्यावसायिक व घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.
