TRENDING:

Mumbai News: इन्स्टाग्रामची एक पोस्ट अन् अपहरण झालेली 17 वर्षीय मुलगी 8 महिन्यांनंतर सापडली, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Mumbai Crime: ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यांनंतर शोध घेण्यात ओशिवरा पोलिसांना यश आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका मुलीचा पोलिसांना शोध लावण्यात यश प्राप्त झाले आहे. ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा तब्बल आठ महिन्यांनंतर शोध लागला आहे. महाराष्ट्र, आसाम आणि तामिळनाडू या तीन राज्यांत सलग दहा दिवस चालवलेल्या विशेष शोध मोहिमेमुळे हा गुन्हा उघडकीस आला असून, याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai News: इन्स्टाग्राम पोस्टमुळे लागला मुलीचा शोध, अपहरण केलेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांनंतर सापडली
Mumbai News: इन्स्टाग्राम पोस्टमुळे लागला मुलीचा शोध, अपहरण केलेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांनंतर सापडली
advertisement

22 मे 2025 रोजी रात्री 10 ते 23 मे रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान या कालावधीत अनोळखी व्यक्तीने फूस लावून आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार एका महिलेने ओशिवरा पोलिसांकडे केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत अपहृत मुलीच्या आधार कार्डवरील पत्त्यानुसार बिहारमधील सासाराम येथे दोन वेळा पथक पाठवले. तसेच तिच्या मैत्रिणींची चौकशी केली असता, मुलीकडे स्वतःचा मोबाइल नसला तरी ती इतरांच्या मोबाइलवरून सोशल मीडिया, विशेषतः इन्स्टाग्रामचा वापर करत असल्याची माहिती समोर आली.

advertisement

तांत्रिक तपासादरम्यान मोबाइलचे लोकेशन सुरुवातीला आसाममधील काही भागांत आढळले. मात्र मोबाइल बंद असल्याने तपासात अडथळे निर्माण झाले. 27 डिसेंबर रोजी मोबाइल सुरू होताच त्याचे लोकेशन आसामच्या खेरोणी भागात दिसून आले. यानंतर पोलिस पथक तातडीने विमानाने आसामला रवाना झाले. पुढील तपासात मोबाइलचे लोकेशन तामिळनाडूतील तिरुवेल्लूर जिल्ह्याजवळ आढळल्याने पोलिसांनी चेन्नई गाठले. तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडियावरील हालचालींच्या आधारे मुलगी आसाममधील लांबडिंग परिसरात असल्याचा संशय बळावला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 10 लाख रुपयांचा पेन, पुणेकरांसाठी मोफत प्रदर्शन, कधी आणि कुठं पाहता येणार?
सर्व पहा

स्थानिक पोलिसांच्या मदतीने लांबडिंग रेल्वे स्टेशन परिसरात सायंकाळच्या सुमारास मुलगी एकटी आढळून आली. महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या मदतीने तिला सुरक्षित ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर तिला बालकल्याण समितीसमोर हजर करून समितीच्या आदेशानुसार वन स्टॉप सेंटरमध्ये सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत ओशिवरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार सिद्धार्थ भंडारे आणि शिपाई रूपाली सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: इन्स्टाग्रामची एक पोस्ट अन् अपहरण झालेली 17 वर्षीय मुलगी 8 महिन्यांनंतर सापडली, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल