महापालिका शाळा ते थेट जर्मनी, श्रावणीने मिळवली 8000000 रुपयांची शिष्यवृत्ती
दोन पोलिस कर्मचाऱ्यांना व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून मिळालेल्या 'ट्रॅफिक चलन'वर क्लिक केल्यानंतर हॅकर्सने त्यांच्या बँक अकाऊंटमधील लाखो रुपयांवर गंडा मारला आहे. हॅकर्सने त्यांच्या बँक अकाऊंटमधील एकूण १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट) नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, राज्यपालांकडे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका पोलिस निरीक्षकाला गेल्या आठवड्यात व्हॉट्स ॲपवर 'ई- चलन'ची लिंक आली होती. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या पोलिस निरीक्षकांच्या बँक खात्यातील तब्बल ३ लाख रुपये एका क्षणात गायब झाले.
advertisement
गणेशोत्सवासाठी पीएमपीएमएलची मोठी घोषणा,धावणार 270 जादा बसेस,असा असेल मार्ग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सध्या ई-चलानच्या घोटाळ्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होत चालली आहे. या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे. या ई-चलनात मालवेअर नावाचे एक हॅकिंग सॉफ्टवेअर कनेक्ट आहे, जे हॅकरला पीडिताच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळतो. त्या लिंकवर केल्यानंतर युजर्सचा मोबाईल काही क्षणातच हॅक होतो. शिवाय, ॲपच्या माध्यमातूनही हॅकरला युजर्सच्या मोबाईलचा ॲक्सेस मिळू शकतो. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून येणाऱ्या ओटीपीतूनही युजर्सचा मोबाइल हॅक होऊ शकतो. यामधून हॅकर युजर्सचे क्रेडिट कार्ड आणि बँकिंग तपशील सुद्धा चोरू शकतो. सोबतच युजर्सचा स्मार्टफोनही हॅकर नियंत्रित करू शकतो.
पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय! क्यूआर कोड स्कॅन करून मिळणार नाही तिकिट
"सायबर फसवणूक करणारे वाहनचालकाला अशा पद्धतीने ई-चलान पाठवतात, की सामान्य व्यक्ती त्याला बळी पडून त्यावर क्लिक करत आलेले 'ई- चलान' पटकन भरून टाकतात. पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारींमध्ये ही लिंक पोलिसांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर शेअर करण्यात आली होती," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
"एकदा मोबाईल फोन हॅक झाला की, हॅकरला युजर्सच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस अगदी सहजतेने मिळून जातो. त्या माध्यमातून हॅकर त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या संपर्काला आणि इतर व्हॉट्स ॲप ग्रुप्समध्येही लिंक पाठवून देतो. आम्हाला संशय आहे की, २९ जुलै रोजी ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये आणि ताडदेव येथे नोंदवलेल्या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणाचे तरी अकाउंट हॅक झाले होते. त्या युजर्सच्या मोबाइलवरूनच हॅकरने व्हॉट्स ॲप ग्रुपवर लिंक शेअर केली होती. त्या ग्रुपमध्ये सर्वच पोलिस कर्मचारी होते." असे अधिकाऱ्याने सांगितले.
तुमचं मुल सतत आजारी पडतंय? हे घरगुती उपाय करून पाहाच
पोलिसांनी सांगितले की, आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांनी ट्रॅफिक चलनसाठी अज्ञात लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन आम्ही करत आहोत. जर चुकून कोणाचेही पैसे चोरीला गेलेच तर, त्यांनी ताबडतोब राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा. अधिकाऱ्यांना व्यवस्थित माहिती द्यावी.
