TRENDING:

Mumbai Pune New Highway : मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी खुशखबर; एक्सप्रेस वे आणि जुना हायवे सोडून आता मिळणार तिसरा पर्याय

Last Updated:

Mumbai Pune New Highway: आता पुण्यातून मुंबईला जाणे किंवा मुंबईहून पुण्याला जाणे अतिशय सोपे आणि वेगवान होणार आहे. नेमका कोणता पर्याय प्रवाशांना मिळणार आहे ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या दोन शहरात दररोज ये-जाण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन एक महत्त्वपू्र्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
News18
News18
advertisement

मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी खुशखबर

मुंबई आणि पुणे शहरादरम्यानची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन एक नवीन महामार्ग उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबई-पुणे दरम्यान तिसरा द्रुतगती मार्ग तयार केला जाणार असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील महिन्याभरात या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पहिला टप्पा कसा असेल?

advertisement

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अटल सेतू येथील पागोटे ते कर्जतजवळील चौक या दरम्यान रस्ता तयार केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मागील वर्षी मुंबई-बंगळुरू एक्सप्रेस वेची घोषणा केली होती. या मोठ्या प्रकल्पाचाच एक महत्त्वाचा भाग मुंबई-पुणे दरम्यानचा हा नवीन मार्ग आहे.

पर्यायी मार्ग उभारण्याचा निर्णय

सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि जुन्या महामार्गावर नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यायी आणि जलद प्रवासासाठी हा नवीन मार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौक (कर्जत) ते शिवरे (खेड शिवापूर) या टप्प्यासाठीही मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण होत आली आहे.

advertisement

नवीन द्रुतगती मार्ग आठ पदरी असणार असून भविष्यात तो सोळा पदरी करण्याचीही शक्यता आहे. त्यासाठी सुमारे 100 मीटर रुंदीची जागा संपादित केली जाणार आहे. लोणावळा ते खोपोलीदरम्यान नवीन मार्ग तयार केला जाणार असून त्यामध्ये बोगदे आणि उड्डाणपूलही असतील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

हा मार्ग लोणावळ्यातून पवना खोऱ्यातून मुळशीमार्गे खेड शिवापूरपर्यंत जाणार आहे. पुढे तो शिवरे येथील रिंग रोडला जोडला जाणार असल्याने सातारा, सांगली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune New Highway : मुंबई-पुणे प्रवासासाठी मोठी खुशखबर; एक्सप्रेस वे आणि जुना हायवे सोडून आता मिळणार तिसरा पर्याय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल