मुंबईतील माहीम परिसरात राहणारे प्रशांत जनार्दन पळ हे गेल्या 18 वर्षापासून न चुकता 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर पडलेले तिरंगी झेंडे गोळा करत असतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत यांनी 2005 साली ‘तिरंगा उठाव’ मोहीम सुरू केली. दादर माहीम परिसरातील पदपथ शाळा शिवाजी पार्क अशा ठिकाणी ध्वजारोहणाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या प्रभागात फिरून झेंडे गोळा करतात.
advertisement
बाप्पाच्या सजावटीसाठी कुठं कराल खरेदी; मुंबईच्या या बाजारपेठेत 50 रुपयांपासून मिळतात वस्तू
पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज कोणाच्याही पायाखाली येऊ नये. आपल्या देशाचा अपमान होऊ नये यासाठी मी हे काम गेली 18 वर्ष करत आहे. गेल्या अठरा वर्षांमध्ये आत्तापर्यंत आम्ही 8 लाखांपेक्षा जास्त झेंडे जमा केले आहेत. या जमा केलेल्या कागदी तिरंग्यांचा वृक्षारोपण करून त्यांच्या मुळांशी तिरंग्यांचा सन्मानाने विनियोग केला जातो. विशेष म्हणजे भारतीय शहिदांच्या नावाने हे वृक्षरोपण केले जाते, असं प्रशांत यांनी सांगितलं.
कारगिलचे जवान पाहतायेत रोहितची वाट; 17 वर्षांपासूनचं व्रत, कधीही पाहिला नसेल असा रक्षाबंधनाचा सोहळा!
प्रशांत पळ यांच्या या कामाला आता अनेक मुंबईकरांचा पाठिंबा मिळत आहे. ‘मी प्रशांत पळ यांना रस्त्यावर राष्ट्रीय ध्वज गोळा करताना पाहिलं होतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेली पाच वर्ष दादर वरळी टॅक्सी संघटनेतले सर्व टॅक्सी चालक आणि मी त्यांना या कामात मदत करतो, असं मनोज मिसाळ यांनी सांगितलं.