बाप्पाच्या सजावटीसाठी कुठं कराल खरेदी; मुंबईच्या या बाजारपेठेत 50 रुपयांपासून मिळतात वस्तू

Last Updated:

गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी कमी किंमतीमध्ये मस्त पर्याय या बाजारात उपलब्ध आहेत.

+
News18

News18

मुंबई, 15 ऑगस्ट : गणपती बाप्पाच्या आगमनाचे पडघम मुंबईतील बाजारपेठेत वाजू लागले आहेत. मखर, डेकोरेशनचे साहित्य, इलेक्ट्रिक लाईट या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. गणरायाच्या आगमनासाठी  प्रसिद्ध लोहार चाळ देखील सज्ज झालीय.  एखादा लहानगा खेळण्याच्या दुकानात गेल्यावर हरखून जावा, तशी इथे खरेदीला आलेल्यांची अवस्था असते. दरवर्षी इथे काही तरी नवं पाहायला मिळतं
इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लोहार चाळ ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी  आ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे 400 ते 500 दुकानं आहेत.मुंबईच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्तांची खरेदीसाठी लगबग सध्या वाढलेली पाहायला मिळत आहे. अवघ्या पन्नास रुपयापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू  इथं पाहायला मिळतात.
advertisement
सजावटीसाठी लागणारे पारंपारिक तोरण या बाजारपेठेत पन्नास ते हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्पॉटलाईट, पारलाईट बायसन, असे अनेक पर्याय आहेत. सध्याच्या ट्रेंडिगनुसार फ्लॅक्स नियॉन नावांमध्ये गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः, बाप्पा मोरया, कस्टमर पद्धतीने देखील तयार करून मिळतं. गणेश मंडळांसाठी लागणारे वेगवेगळे  लायटिंगचे प्रकार देखील या बाजारपेठेत स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
advertisement
यावर्षी  ट्रेंडिंगच्या लाईटचे अनेक प्रकार उपलब्ध असून त्याला चांगली मागणी आहे. तोरण स्पॉटलाईट, नेमप्लेट, डिस्को लाईट, एलईडी लाईट, असे अनेक प्रकार या बाजारपेठेत आहेत. ते खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे, अी माहिती येथील दुकानदार कृष्णा चव्हाण यांनी दिली.
मराठी बातम्या/मुंबई/
बाप्पाच्या सजावटीसाठी कुठं कराल खरेदी; मुंबईच्या या बाजारपेठेत 50 रुपयांपासून मिळतात वस्तू
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement