मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना मेट्रो सिनेमा परिसरातील शासकीय कार्यालयाच्या आवारात घडली आहे. आता एमएमआसीने या प्रकरणी संबंधित पाणीपुरवठा कंत्राटदाराविरोद्धातही गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे मेट्रो तीनच्या कोणत्याही सेवेवर परिणाम झाला नाही.
पाण्यासाठी खोदलं अन् मेट्रोचं नुकसान केलं
मुंबईतील नागरिकांच्या पसंतील आलेली आरे-कफ परेड ही पहिली भुयारी मेट्रो आहे. जी 33.5 किलोमीटर लांबीची असून ऑक्टोबर 2025 मध्ये पूर्ण क्षमतेन धावू लागली होती. त्यातही या भुयारी मार्गिकेवरील स्थानक थेट सीएसएमची रेल्वे स्थानकाला जोडण्यात आल्याने प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ झाली.
advertisement
या दरम्यान मुंबईतील टॅंकरने पाणीपुरवठा करत असलेल्या एका कंत्राटदाराने दक्षिण मुंबईतील सीएसएमटी मेट्रो स्थानकाजवळील शासकीय कार्यालच्या आवाकात गेल्या दोन दिवसांपू्र्वी बोअर वेल खोदण्याचा प्रयत्न केला होता. पण हे खोदकाम सुरु असतानाचा सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या जळील मेट्रो 3 च्या असलेल्या भुयाराचे नुकसान झाले. ही घटना समजताच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी केली. त्यानंतर घटनेची दखल घेऊन एमएमआरसीने संबंधित असलेल्या कंत्राटदाराविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे.
धक्कादायक कारण आलं समोर
मेट्रोच्या पायाभूत असलेल्या सुविधांची सुरक्षितता तपासण्यासाठी , मेट्रो मार्गिका 3 च्या दोन्ही बाजूंनी 50 मीटरच्या असलेल्या क्षेत्रात कोणतेही काम करण्याआधी एसएमआरसीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पण त्या कंत्राटदाराने अशी कोणतीही परवानगी न घेताच बोअर वेलचे खोदकाम सुरु केल्याचे समोर आले आहे.
