मुंबईत तापमान 36.2 अंश सेल्सिअसवर स्थिर होते, तरी उपनगरांमध्ये उकाड्याचा जोर अधिक होता. ठाणे, ऐरोली, खारघर, कल्याण, अंबरनाथसारख्या भागांमध्ये चटके अधिक तीव्र जाणवले. ऐरोली आणि खारघरमध्ये तापमान 40.7 अंश, तर कल्याण व अंबरनाथमध्ये तब्बल 42.2अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
Thane Water Cut: ठाणेकर पाणी जपून वापरा, या भागात पाण्याचा थेंबही येणार नाही, कारण काय?
advertisement
हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या मते, गुजरातमधील उष्णतेच्या लाटेचा परिणाम मुंबईवर होत आहे. वायव्येकडून येणारे गरम वारे, आकाशात मळभ नसणे आणि समुद्रकाठचे वारे स्थिर होणं, या सर्व कारणांमुळे उन्हाचा त्रास वाढतोय.
फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला तापमान वाढले होते, पण नंतर काही काळ स्थिर होते. मात्र आता पुन्हा सूर्यकिरणांचा थेट प्रभाव जाणवत असून, पुढील दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवारही उष्णतेचा तडाखा राहण्याची शक्यता आहे.
कुठे किती तापमान? (8 एप्रिल)
मुंबई: 36.2 अंश
ठाणे: 40.1 अंश
मुंब्रा: 40.1अंश
बेलापूर: 40.1अंश
ऐरोली: 40.7 अंश
खारघर: 40.7 अंश
कोपरखैरणे: 40.6 अंश
पनवेल: 39.5 अंश
कल्याण व अंबरनाथ: 42.5अंश
कर्जत: 41.7अंश
सावधगिरी आवश्यक
मुंबईत उन्हाची तीव्रता वाढली असून उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळा, भरपूर पाणी प्या, टोपी किंवा छत्री वापरा आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करा, असे आवाहन करण्यात आले आहे.