या नव्या बोगदा प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती मार्गाच्या दक्षिण टोकावरून थेट मरिन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास केवळ 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे दररोज सुमारे 80 हजार वाहनधारकांचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. एकूण 9.23 किलोमीटर लांबीच्या या मार्गात 6.52 किलोमीटर अंतर दुहेरी बोगद्यांचे असेल.
आजचं हवामान: राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट, या 9 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
advertisement
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढील पाऊल
या बोगद्यांमुळे मरिन ड्राइव्हकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सागरी किनारा मार्गाच्या टोकापासून ते एनसीपीए दरम्यान सहा पदरी पूल (रस्ते) तयार करण्यात येणार आहेत. हा रस्ता वाहतुकीचा भार कमी करण्यात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा आढावा
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नुकतीच आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रकल्पासंदर्भात काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून, सहा पदरी रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला आहे.
7,765 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, पूर्व आणि पश्चिम मुंबईमधील अंतर प्रत्यक्षात लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.