समोर आलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दोन ते तीन दिवस अगोदर मुंबई ते विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग अशी रो रो सेवा सुरू होणार आहे. मुंबई ते मांडव्या दरम्यान रो रो सेवा पुरवणाऱ्या 'एम टू एम' कंपनीची एक बोट मुंबई ते विजयदुर्गदरम्यान धावणार आहे. ही बोट दोन किंवा तीन मजल्यांची असेल. या बोटीच्या दिवसाला दोन फेऱ्या होतील. या बोटीतून एका वेळी 50 ते 60 चारचाकी वाहने आणि सुमारे 400 ते 500 प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील.
advertisement
Konkan Railway : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! पेण आणि रोह्याला थांबणार दोन गाड्या
ही सेवा सुरू होण्यासाठी विजयदुर्ग येथील जेट्टीत सुधारणा केल्या जात आहेत. याशिवाय, मुंबईतील माझगाव येथे रो रो सेवेच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रो रो सेवेच्या ट्रायल घेतल्या जातील. गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू झाल्यास मुंबईतून कोकण, विजयदुर्ग आणि देवगडला अवघ्या सहा तासांत पोहोचता येणार आहे.
रो रो सेवेमुळे देवगड, मालवण, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी चांगला आणि जलद पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास बंदर प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. सध्या कोकणात पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेने 10 ते 11 तासांचा कालावधी लागतो. रस्ते मार्गे जाण्यासाठी 14 तासांहून अधिक वेळ लागतो.
