आज आणि उद्या पालिकेकडून पाणी कपात जाहीर
मुंबईत मेट्रो 7 अ प्रकल्पाच्या कामासाठी जलवाहिनीचे काम 'के पूर्व' विभागात आजपासून ते गुरुवार 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईतील काही विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
जी उत्तर विभाग
जी उत्तर विभागातील धारावी परिसरात जस्मिन मिल मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, 60 फूट आणि 90 फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर, ए. के. जी. नगर, धारावी मुख्य मार्ग, माहीम फाटक आदी भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
advertisement
के पूर्व विभाग
के पूर्व विभागातील मुलगाव डोंगरी, एमआयडीसी, कोंडिविटा, मरोळ, जे. बी. नगर, चकाला, विमानतळ परिसर, बामणवाडा, पारसीवाडा, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अँड टी. कॉलनी आदी भागांत दोन्ही दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. काही भागांत बुधवारी तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
एस विभाग
एस विभागात विक्रोळी-कांजूरमार्ग परिसर, भांडुप (पश्चिम), कोकण नगर, काजू टेकडी, टेंभीपाडा, शास्त्रीनगर, जयधिम नगर, पाधपोली गाव आदी भागांत काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. आरे मार्ग परिसरात दोन दिवस सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी मिळणार नाही.
एच पूर्व
एच पूर्व विभागातील संपूर्ण बीकेसी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. एन विभागात विक्रोळी पश्चिम, गोदरेज कुंपण, कैलास संकुल, सागर नगर आदी भागांत ठरावीक वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
