TRENDING:

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी बंद, कधी आणि कुठं?

Last Updated:

Mumbai Water: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून पुढील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: उष्ण आणि दमट हवामानामुळे हैराण मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याचा जपून वापर करावा लागेल. गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावर उड्डाणपुलाचा पोहोच रस्ता भागातील 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. आज, 10 मार्च रोजी सकाळी 9 ते बुधवारी, 11 मार्च रोजी सकाळी 9 दरम्यान हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात 'पी पूर्व' आणि 'पी दक्षिण' विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्ण बंद, तर काही भागात अंशत: बंद राहील.
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी बंद, कधी आणि कुठं?
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी बंद, कधी आणि कुठं?
advertisement

मुंबईतील गोरेगाव परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहील. दुरुस्ती कामानंतर देखील काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच गरजेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Weather Alert: महाराष्ट्रात 48 तास धोक्याचे, मार्चमध्येच सूर्याचा प्रकोप, 14 जिल्ह्यांना अलर्ट

इथं पाणीपुरवठा बंद राहणार

advertisement

'पी पूर्व' आणि ‘पी दक्षिण’ भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये शिवशाही प्रकल्प, श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था, सॅटेलाईट टॉवर, माळी नगर, संतोष नगर, हबळे पाडा, नगरमोडे पाडा, उमरशेट पाडा, सुनील मैदान, फिल्म सिटी मार्गालगतचा परिसर आदी भागात पाणीपुरवठा बंद राहील.

या भागात कमी दाबाने पुरवठा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

मंगळवारी रोजी मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग आणि आर्य भास्कर मार्ग या भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी बंद, कधी आणि कुठं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल