TRENDING:

Navi Mumbai News: धक्कादायक! लोकलमध्ये तृतीयपंथी चढला अन्..., महिलेसोबत जे केलं त्यानं सर्व हादरले; नेमकं घडलं काय?

Last Updated:

एका तृतीयपंथीयानं मुंबई लोकलमध्ये एका महिला तरूणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार पनवेल- सीएसएमटीमधील लोकलमध्ये घडला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तृतीयपंथीयानं मुंबई लोकलमध्ये एका महिला तरूणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार पनवेल- सीएसएमटीमधील लोकलमध्ये घडला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सेक्युरिटीचा प्रश्न उद्भवला आहे. ही घटना जनरल डब्ब्यामध्ये घडली आहे. जर, जनरल डब्ब्यामध्येच महिला सुरक्षित नसतील तर, महिला डब्ब्यांमध्ये खरोखरच महिला सुरक्षित असतील का? असा प्रश्न सध्या पडला आहे.
Navi Mumbai News: धक्कादायक! लोकलमध्ये तृतीयपंथी चढला अन्..., महिलेसोबत जे केलं त्यानं सर्व हादरले; नेमकं घडलं काय?
Navi Mumbai News: धक्कादायक! लोकलमध्ये तृतीयपंथी चढला अन्..., महिलेसोबत जे केलं त्यानं सर्व हादरले; नेमकं घडलं काय?
advertisement

एका तृतीयपंथीयानं मुंबई लोकलमध्ये 28 वर्षीय तरूणीचा विनयभंग केला आहे. हा प्रकार हार्बर रेल्वे मार्गावर घडला आहे. पनवेल- सीएसएमटी लोकलमध्ये एका 28 वर्षीय महिला तरूणीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी नेरूळ स्थानकावर लोकल आली. त्या स्थानकावर त्या लोकलच्या जनरल डब्ब्यामध्ये तृतीयपंथीय चढला. त्याने प्रवाशांकडे पैसे मागायला सुरूवात केली. जेव्हा लोकलने सीवूड्स स्टेशन क्रॉस केलं, तेव्हा त्या तृतीयपंथीयामध्ये आणि एका पुरुष प्रवाशामध्ये वाद झाला, त्याने तृतीयपंथीयाला पैसे देण्यास नकार दिला.

advertisement

तो तृतीयपंथीय प्रवाशांकडे पैसे मागत असताना त्याचा एका प्रवाशासोबत शा‍ब्दिक वाद झाला. एका पुरुष प्रवाशाने त्या तृतीयपंथीयाला पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. त्यानंतर तो एका कपल जवळ गेला आणि पैसे मागू लागला. पैसे मागताना या तृतीयपंथीयाने तरुणीच्या खांद्याला अश्लील स्पर्श केला ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. त्यानंतर ट्रेन नेरुळ स्टेशनवर येताच हे दोघेही ट्रेनमधून खाली उतरले. शिवाय त्या जोडप्याने आरोपीला थांबवले आणि ड्युटीवर असलेल्या जीआरपी अधिकार्‍याला घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

वाशी रेल्वे स्थानकावर ते कपल आणि तृतीयपंथीय उतरल्यानंतर त्यांनी तृतीयपंथीयाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वाशी जीआरपीने आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान अशा प्रकारच्या घटना लोकलमध्ये सर्रास वाढताना दिसत आहेत. तृतीयपंथीय लोकलमधील प्रवाशांकडून नेहमीच पैसे घेताना आढळून येतात. पैसे न दिल्यास अनेकदा ते शिवीगाळ आणि जबरदस्ती देखील करतात. या घटनेने लोकलमधील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच अशा व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai News: धक्कादायक! लोकलमध्ये तृतीयपंथी चढला अन्..., महिलेसोबत जे केलं त्यानं सर्व हादरले; नेमकं घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल