TRENDING:

Love Jihad : निजामने पूनमला का संपवलं? नवी मुंबईतील 'लव्ह जिहाद' प्रकरणात मोठी अपडेट

Last Updated:

नवी मुंबईच्या मानखुर्द भागातून बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह सापडला आहे. उरण भागामध्ये एका सुटकेसमध्ये पूनम क्षीरसागरची डेडबॉडी आढळून आली आहे. पूनम क्षीरसागरचा मृत्यू लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मानखुर्द : नवी मुंबईच्या मानखुर्द भागातून बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह सापडला आहे. उरण भागामध्ये एका सुटकेसमध्ये पूनम क्षीरसागरची डेडबॉडी आढळून आली आहे. पूनम क्षीरसागरचा मृत्यू लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला जात आहे. पूनम 10 दिवसांपूर्वी निजाम नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत बेपत्ता झाली होती. मागच्या 4 वर्षांपासून दोघं रिलेशनशीपमध्ये होते. निजामचं लग्न आधीच झालं होतं आणि त्याचं कुटुंब लखनऊला राहतं. निजामला एक मुलही आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पूनमला निजामचं लग्न झालं नसल्याचं माहिती नव्हतं. दोघांमध्ये फोनवर भांडण झालं त्यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
निजामने पूनमला का संपवलं? नवी मुंबईतील 'लव्ह जिहाद' प्रकरणात मोठी अपडेट
निजामने पूनमला का संपवलं? नवी मुंबईतील 'लव्ह जिहाद' प्रकरणात मोठी अपडेट
advertisement

हत्येचा घटनाक्रम

पूनमला निजाम 18 एप्रिलला पळवून घेऊन गेला होता. 11 दिवस तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली, यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. 27 एप्रिलला उरणमध्ये सुटकेसमध्ये पूनमचा मृतदेह आढळून आला. यानंतर आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कुटुंबातील सदस्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. तसंच 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.

advertisement

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

'निजाम नावाचा टॅक्सी ड्रायव्हर तिला 18 एप्रिलला पळवून घेऊन गेला होता. कल्याणमध्ये या मुलीला घेऊन तो गेला आणि तिची हत्या केली, त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडला गेला. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली, हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे,' असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

advertisement

'मुंबईमधील ही तिसरी घटना आहे, त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांगलादेशींचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाहीत. 24 तासाच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलन करू', असा इशारा मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.

या प्रकरणातील आरोपी निजाम खान हा सँडहर्स्ट रोड परिसरात वास्तव्यास होता. नोकरीसाठी जात असताना त्याची आणि पूनमची ओळख झाली, या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Love Jihad : निजामने पूनमला का संपवलं? नवी मुंबईतील 'लव्ह जिहाद' प्रकरणात मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल