नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'ब' मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता आणि इतर अटी- शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवेतील आहेत. भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता आधीच नवी मुंबई महानगर पालिकेकडून ही जाहिरात देण्यात येत आहे. जाहिरातीनुसार गट 'ब'मधील एकूण 07 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 05-01-2026 पासून ते दिनांक 04-02-2026 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 04-02-2026 या दिवशी रात्री 11:55 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्जप्रक्रिया करायची आहे.
advertisement
सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी या तिन्ही पदांवर 07 रिक्त जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. अनुक्रमे 05, 01 आणि 01 अशा तीन पदांसाठीच्या रिक्त जागा आहेत. या तिन्ही पदांसाठीची वेतनश्रेणी सहाय्यक आयुक्त पदासाठी 44900 ते 1,42,400, महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी 41800 ते 1,32,300 अशी वेतनश्रेणी असेल. ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू दि. 05-01-2026 पासून सुरू होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दि. 04-02-2026 पर्यंत आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. 04-02-2026 पर्यंत आहे.
अर्ज भरण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची तारीख एकत्रित सुरू होणार असून अंतिम मुदत तारीख सुद्धा एकच आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उमेदवारांना परिक्षेच्या 7 दिवस आधी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन परीक्षेची तारीख हॉलतिकिटाव नमूद केल्यानुसार आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध केले जाणार आहे. परीक्षा शुल्काविषयी सांगायचे तर, खुला प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रूपये परीक्षा शुल्क असेल, तर मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिक दुर्बल घटाकातील उमेदवारांना 900 रूपये इतके परीक्षा शुल्क असेल. परीक्षा शुल्क सुद्धा उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.
परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र हॉलतिकिटामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत इत्यादींबाबतचा तपशील आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादींबाबतचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
