नवी मुंबईच्या सीवूड्समध्ये हा प्रकार घडला आहे. नवी मुंबईच्या सीवूड्समधील एका महिलेची सायबर गुन्हेगाराकडून लाखो रूपयांची फसवणूक झाली आहे. त्या महिलेची तब्बल 16 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी त्या महिलेला एका व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर त्यांनी महिनाभर ग्रुपमधील सर्व सदस्यांच्या इनकम सोर्सकडे लक्ष ठेवले. यादरम्यान इतरांच्या नफ्याच्या मेसेजला भुलून त्यांनीही गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
advertisement
सीवूड परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेसोबत फसवणूकीचा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात त्यांना इन्स्टाग्रामवर ऑनलाइन ट्रेडिंगबद्दल माहिती मिळाली होती. त्याला भुलून त्यांनी लिंकवर क्लिक केले असता, त्यांना व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये जॉईंट करून घेण्यात आलं. जवळपास महिनाभर ग्रुपमधल्या इतरत्र सदस्यांचे वेगळं इनकम सोर्स वाढत असल्याचे मेसेजेस त्या पाहत होत्या. यावेळी इतरांना नफा होत असल्याने आपल्यालाही नफा होईल, असा विश्वास बसल्याने त्यांनी टप्प्याटप्प्याने 16 लाख 79 हजार रुपये गुंतवले होते. मात्र, त्यांना ना नफ्याची रक्कम मिळाली ना मूळ रक्कम. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत धाव घेतली. नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
