कधीपासून सुरु होणार सेवा?
इंडिगो एअरलाईन्सने नवी मुंबई ते जामनगर अशी थेट विमानसेवा २३ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवेमुळे प्रवाशांना आता जामनगरला जाण्यासाठी इतर शहरांमध्ये बदल करावा लागणार नाही. त्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि जलद होणार आहे.
'या' मार्गांवर सध्या उड्डाण सेवा सुरू
सध्या इंडिगोची अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि भावनगर या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता या यादीत जामनगरचाही समावेश होणार आहे. या नवीन मार्गावर ए 320 विमानांद्वारे सेवा दिली जाणार आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून दररोज दुपारी 4 वाजता विमान उड्डाण घेईल. इंडिगोचे ६E-2053 हे विमान सुमारे दीड तासांच्या प्रवासानंतर सायंकाळी साडेपाच वाजता जामनगर विमानतळावर पोहोचेल.
या सेवेमुळे व्यवसायिक, पर्यटक तसेच गुजरातमध्ये कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कमी वेळेत आणि थेट प्रवासाची सुविधा मिळाल्याने या मार्गावरील हवाई प्रवासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.
