1- 2 ऑक्टोबरला मध्य रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक; लोकल-एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल
कमळाला सर्वाधिक मागणी
नवरात्र म्हटलं की देवीला विशेषतः कमळाची फुलं वाहिली जातात. यंदा कमळाचे दर गगनाला भिडले असून उमलेलं कमळ 60 रुपये नग तर कमळाची कळी तब्बल 120 रुपये डझन झाली आहे
गुलाब– शेवंतीचे वाढलेले भाव
शेवंती – पाव किलो 60 रुपये
advertisement
गुलाब – पाव किलो 80 रुपये
झेंडू – अर्धा किलो 50 रुपये
गजरे, हार आणि वेणीचे दर
मोगऱ्याचा गजरा – 100 रुपयांना 4 लहान
मोठा हार – 120 रुपयांना एक
छोटा हार – 50 रुपयांपासून उपलब्ध
फुलांची वेणी – 30 रुपयांना एक किंवा 50 रुपयांना दोन
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल, या जिल्ह्यासाठी अलर्ट
दसऱ्याच्या निमित्ताने आपट्याची पानं
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोने मानली जातात. त्यामुळे बाजारात आपट्याच्या पानांचीही मोठी मागणी असून ती 20 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय रंगीबेरंगी हार, नव्या प्रकारच्या सजावटीच्या वेण्या आणि देवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तूंचाही बाजारात खूपच उठाव आहे.
1 ऑक्टोबरपासून रेल्वे रिझर्व्हेशचे नवीन नियम लागू, आत्ताच जाणून घ्या; नाही तर...
सणाचा माहोल आणि महागाईची चाहूल
सकाळपासूनच दादर फुल मार्केटमध्ये खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळत आहे. देवीची पूजा, दसऱ्याची विजयी सोहळा आणि आपट्याची पानं वाटप या सगळ्यामुळे बाजारपेठ सणाच्या उत्साहाने गजबजली आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे दर झपाट्याने वाढल्याने ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तरीसुद्धा सणाचा आनंद घेण्यासाठी बहुतेकांनी महागाईकडे दुर्लक्ष केलं आहे.