TRENDING:

गरबाची आताच करा तयारी! 500 रूपयांपासून इथं मिळेल घागरा-चनिया चोली, VIDEO

Last Updated:

Ghagraa Chaniyacholi Just 500rs : नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे आणि मुंबईतल्या बाजारपेठा आधीच रंगीबेरंगी झाल्या आहेत. दांडिया-गरब्यासाठी लागणारे पारंपरिक कपडे म्हणजे घागरा-चनिया चोलीची जबरदस्त मागणी या दिवसांत वाढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नवरात्र उत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे आणि मुंबईतल्या बाजारपेठा आधीच रंगीबेरंगी झाल्या आहेत. दांडिया-गरब्यासाठी लागणारे पारंपरिक कपडे म्हणजे घागरा-चनिया चोलीची जबरदस्त मागणी या दिवसांत वाढली आहे. अशावेळी जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा होलसेलमध्ये मोठ्या प्रमाणात घागरा- चनिया चोली खरेदी करायची असेल, तर मुंबईतील भुलेश्वर मार्केट हा सर्वोत्तम पर्याय आहे.
advertisement

भुलेश्वर मार्केट – रिटेल आणि होलसेल दर

1) इथे रिटेलमध्ये चनिया चोली फक्त ₹550 पासून सुरू होते.

2) जर तुम्ही होलसेलमध्ये (12 किंवा 20 पीस एकाच रंगाचे) घेतले, तर किंमत आणखी कमी मिळते.

3) बाहेर इतर मार्केटमध्ये हेच कपडे किमान ₹1100 पासून सुरू होतात. त्यामुळे भुलेश्वर हा खरेदीसाठी खूपच फायदेशीर पर्याय आहे.

advertisement

इथे तुम्हाला पारंपरिक ते मॉडर्न अशा अनेक स्टाईल्समध्ये डिझाईन्स मिळतात –

मिरर वर्क घागरा चोली – ₹850

कच्ची वर्क पॅटर्न – ₹750

प्रिंटेड रेऑन-कॉटन घागरा – ₹650

जॅकेट स्टाईल चनिया चोली – ₹800

हँडवर्क आणि झगमगते डिझाईन्स – ₹1100 पर्यंत

साधा डेलीवेअर घागरा चोली – ₹550 पासून

ओढणी आणि इतर कलेक्शन

advertisement

फक्त घागरा चोलीच नाही, तर इथे स्वतंत्र ओढणी (दुपट्टे) फक्त ₹150 पासून मिळतात. लहान मुलांसाठी खास जॅकेट्स ₹350 पासून सुरू होतात.

मराठी बातम्या/मुंबई/
गरबाची आताच करा तयारी! 500 रूपयांपासून इथं मिळेल घागरा-चनिया चोली, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल