TRENDING:

Mumbai News : अटल सेतूवरील सुसाट प्रवासाला ब्रेक, पाऊने दोन वर्षात लेन बंद, कारण काय?

Last Updated:

Atal Setu News : देशातील सर्वात लांब समुद्री पूल असलेल्या अटल सेतूवरील प्रवासाला आता ब्रेक बसला आहे. सुरू झाल्यानंतर अवघ्या पाऊण दोन वर्षांतच एका लेनवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील सर्वात लांब समुद्री पूल म्हणून ओळखला जाणारा अटल सेतू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण, अटल सेतूचे उद्घाटन होऊन फक्त 18 महिनेच झाले आहेत आणि आता या प्रसिद्ध पुलाच्या रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम सुरू झाले आहे.
News18
News18
advertisement

अटल सेतूवरील प्रवास का थांबला?

सुमारे 17,840 कोटी खर्च करून आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या सागरी सेतूवर सप्टेंबर महिन्यातच खड्डे पडले होते, तर काही ठिकाणी रस्त्याचा काही भाग उखडला होता. तब्बल 100 वर्षे टिकणारा पूल,असा दावा करणाऱ्यांना चांगलाच चपराक बसला आहे. नागरिकांच्या रोषाने आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनी एमएमआरडीएला जाग आली.https://x.com/i/status/1987031994828771431

advertisement

आता या खड्ड्यांवर फक्त तात्पुरती डागडुजी न करता एमएमआरडीएने रस्त्याचे पूर्ण मजबुतीकरणाचे काम सुरू केले आहे. सध्या नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही भागात काम सुरू असून त्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नियमित प्रवाशांना आता प्रवासादरम्यान मोठ्या विलंबाचा सामना करावा लागणार आहे.

या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. अवघ्या दीड वर्षात रस्त्याचं इतकं वाईट झालं, तर पुढील काळात काय होणार? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं भव्य उद्घाटन आता लोकांच्या मनात मोठी निराशा म्हणून उमठत आहे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, टप्प्याटप्प्याने संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार असून पुढील काही आठवड्यांपर्यंत वाहतूक मर्यादित ठेवली जाणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : अटल सेतूवरील सुसाट प्रवासाला ब्रेक, पाऊने दोन वर्षात लेन बंद, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल