राज्य सरकारने मंजूर केलेल्या नव्या धोरणानुसार ओला, उबेर, रॅपिडो सारख्या कॅब एग्रिगेटर्सबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कार कंपन्यांच्या चालकांनी जर प्रवाशांनी केलेली बुकिंग रद्द केलं, तर आता या कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. या नव्या नियमामुळे कार बुकिंग रद्द करण्याच्या प्रक्रियेला शिस्त लागणार आहे.
Mumbai Local: मुंबईकरांना दिलासा, NEET-2025 साठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, रविवारचा ब्लॉक रद्द!
advertisement
प्रवाशांना दिलासा मिळणार
कॅब बूक करून बऱ्याचदा प्रवासी गाडीची वाट पाहत असत. परंतु, अचानक चालकांनी बुकिंग रद्द केल्याचा मेसेज आल्यास त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बूकिंग रद्द केल्यास आता दोघांनाही दंड
आजपर्यंत प्रवाशांनी बुकिंग रद्द केल्यास केवळ त्यांनाच दंड ठोठावला जात होता. चालकांनी बुकिंग रद्द केल्यास हे नुकसान कॅब सेवा पुरवठा दार स्वत:च्या अंगावर घेत होते किंवा याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. तसेच वाहन चालक परवडणारे भाडे देखील नाही म्हणत ते रद्द करत होते. आता या निर्णयामुळे कॅब चालकांनाही अचानक बुकिंग रद्द करणं महागात पडणार आहे. तसेच बुकिंग रद्द केल्यास प्रवाशांप्रमाणे कॅब कंपन्यांना देखील दंड भरावा लागेल.
प्रवाशांच्या दंडाचीही रक्कम निश्चित
प्रवाशांनी कार बुकिंग केल्यानंतर बुकिंग रद्द केल्यास त्यांना दंड ठोठावला जातो. मात्र या दंडाबाबत कार पुरवठादारांचे नियम व धोरण यात साम्यता आणि स्पष्टता नव्हती. नव्या धोरणात याबाबत देखील नियम निश्चित करण्यात आले आहेत. प्रवाशांनी बुकिंग रद्द केल्यावर बुकिंगनुसार प्रवास केल्यानंतर मिळणाऱ्या भाड्याच्या 50 टक्के किंवा 50 रुपये यापेक्षा जी रक्कम कमी असेल ती दंड म्हणून प्रवाशांकडून वसूल केली जाईल. तसेच हीच रक्कम संबंधित कार चालकाच्या खात्यात जमा केली जाईल, अशी तरतूद नव्या नियमात करण्यात आली आहे.
