आयआरसीटीसीने प्रवाशांच्या हिताचा एक निर्णय घेतला आहे. ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना गावी जायचं तिकिट आता अगदी सहजतेने मिळणार आहे. पूर्वी एजंट्समुळे प्रवाशांना रिझर्व्हेशन मिळत नव्हते. अवघ्या काही तासांमध्येच संपूर्ण ट्रेन हाऊसफुल्ल होत होती. सरकारने काढलेल्या नव्या नियमामुळे आता दलालांच्या घुसखोरीचा प्रकार काही अंशी थांबणार आहे. ऑनलाईन तिकिट बुकिंगसाठीचे नवीन नियम येत्या १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन तिकिटाचं रिझर्व्हेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांमध्ये तेच यूजर्स तिकीट बुक करु शकतात ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे.
advertisement
आधार व्हेरिफिकेशनचा नियम जे एजंट आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून आणि मोबाईल ॲपवरून बुक करत आहेत, त्यांच्यासाठी आहे. ज्यावेळी तुम्ही रेल्वेचं रिझर्व्हेशन करतात, त्यावेळी तुम्हाला आधारकार्ड अनिवार्य असतं. जर आधारकार्ड नसेल तर, जेमतेम पहिले 15 मिनिटामध्येच एजंट तिकिट बुक करू शकणार आहात. यामुळे एजंटचे धाबे चांगलेच दणाणले आहेत, त्यांना एकावेळी जास्त प्रमाणात तिकिट बुक करता येणार नाहीत. नव्या नियमानुसार ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन झालं आहे, अशाच लोकांना रिझर्व्हेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांमध्ये तिकीट बुक करता येणार आहे. हा नियम फक्त ऑनलाइन तिकिट बुक करणार्यांसाठीच आहे.
दरम्यान, आता 1 ऑक्टोबरपासून आधार व्हेरिफाईड अकाऊंटलाच तिकिट बुकिंगसाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानुसार पहिल्या १५ मिनिटांमध्ये व्हेरिफाईड आधार अकाऊंट सोडून इतर अकाऊंटला बुकिंगची परवानगी मिळणार नाही. या नियमाचा मुख्य हेतू तिकिटांची दलाली करणार्यांवर अंकुश लावणे आणि तिकिट व्हेरिफाईड युझर्सपर्यंत पोहोचवणे हा आहे. ऑथेंटिफिकेशन युझर्सपर्यंतच ऑनलाईन बुकिंग मर्यादित करून रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉरमेशन सिस्टम्स आणि आयआरसीटीसीला नवीन आलेल्या अपडेटप्रमाणे 1 ऑक्टोबरपर्यंत तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले आहेत.