लोकसभा निवडणुकीमध्ये विजयानंतर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हजर होते. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आदी नेतेही हजर होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी आम्ही एकत्रच लढवणार आहे. कांद्याच्या निर्णयामुळे भाजपला रडावं लागलं. त्यांनी ज्यांना सोबत घेतलं त्यांच्यामुळे त्यांना रडावं लागलं. मोदींना जनतेनं 10 वर्ष दिले होते. पण यावेळी त्यांची जागा वाचली आहे. आता ते किती दिवस पंतप्रधान राहणार हे माहिती नाही. आता भाजपमुक्त राम झाला आहे. जिथे प्रभू रामाचं अस्तित्व होतं, तिथे भाजप तोंडघशी पडलं आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.
advertisement
'NDA चं सरकार किती दिवस राहील याची गॅरेंटी नाही. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालं आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. तुमचं मंगळसुत्र चोरून नेतील, म्हैस चोरली जातील हे काय खरं नरेटीव्ह होतं का? असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.
'2014 पासून मोदींनी मांडलेले सर्व नरेटीव्ह खोटे होते. M फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? मोदींनी प्रचारात वापरलं ते खरं नरेटीव्ह होतं का? कित्येक कोटी लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. सर्व धर्मियांनी संविधान वाचवण्यासाठी मतदान केलं. महायुतीत तिघंही ओसाड, कुणीही एकत्र नाहीत. जनतेनं धडा शिकवला आता 4 ते 5 महिन्यात जनता ठोस निर्णय घेईल. सहकाऱ्यांमुळे भाजपवर रडण्याची वेळ आली आहे, असंही उद्धव
ठाकरे म्हणाले.