TRENDING:

वसईत पाइपलाइनच्या खोदकामावेळी अपघात, मातीत खचला जेसीबी आणि कंटेनर; काहीजण अडकले

Last Updated:

वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्य पाईपलाइन खोदकाम सुरू आहे. याचे काम सुरू असतानाच पोकलेनसह ऑफिस कंटेनर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, पालघर : वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ खाडीतील सूर्य पाईपलाइन खोदकाम सुरू असताना रस्ता खचल्यानं जेसीबीसह ऑफिस कंटेनर गाडला गेल्याची घटना घडलीय. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडलीय. या ढिगाऱ्याखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्री बारा वाजेपर्यंत तरी कोणतेही बचावकार्य सुरू झाले नव्हते.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ सूर्य पाईपलाइन खोदकाम सुरू आहे. याचे काम सुरू असतानाच पोकलेनसह ऑफिस कंटेनर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. यामध्ये काही व्यक्ती अडकल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जेसीबी ५० फूट खाली मातीत गाडला गेलाय.

ठाणे मुंबई जाणाऱ्या ब्रिज जवळ ही घटना घडली आहे. एका कंटेनरसह पाच ते सात व्यक्ती मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. यामध्ये जेसीबी चालक राकेश कुमार यादव अडकला आहे. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तरी कोणतेही रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले नाही. वाहन धारकांसह नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

advertisement

भुसावळमध्ये गोळीबाराचा थरार, दोघांची गोळ्या झाडून हत्या

भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून माजी नगरसेवकासह दोघांवर गोळीबार करण्यात आलाय. बुधवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास धावत्या गाडीवर गोळीबार केले गाला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि संतोष राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
वसईत पाइपलाइनच्या खोदकामावेळी अपघात, मातीत खचला जेसीबी आणि कंटेनर; काहीजण अडकले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल