'या' तारखेपर्यंत असणार ब्लॉक
कोचिंग कॉम्पलेक्सच्या कामासाठी घेण्यात येणारा ब्लॉक रविवारपासून सुरू होत आहे. त्यानंतर मंगळवार (9 डिसेंबर), रविवार (14 डिसेंबर) आणि मंगळवार (16 डिसेंबर) यांच्या मध्यरात्री नंतर म्हणजेच पहाटे 1.30 ते 3.30 या दोन तासांच्या कालावधीत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक कालावधीत पनवेल स्टेशनच्या विविध मार्गिकांवर रेल्वे वाहतूक नियंत्रित किंवा बंद ठेवली जाणार आहे.
advertisement
ब्लॉकचा परिणाम खरंतर पनवेल स्थानकातील अप आणि डाउन मेल लाईन, अप आणि डाउन कर्जत लाईन, लूप लाईन्स, इंजिन रिव्हर्सल मार्गिका तसेच फलाट क्रमांक ६ आणि ७ वरील रेल्वे मार्गिकांवर होणार आहे. ही कामे सुरू असताना गाड्यांची वाहतूक मंदावणार असून काही एक्स्प्रेस आणि मेल गाड्या उशिराने धावणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एकूण 12 मेल–एक्स्प्रेस गाड्यांना विलंबाचा सामना करावा लागणार आहे.
पनवेल ब्लॉकदरम्यान उशिराने धावणाऱ्या गाड्यांची संपूर्ण यादी जाहीर
1) 7 डिसेंबर मध्यरात्रीनंतर -(22193) दौंड-ग्वालियर एक्स्प्रेस
2) 9 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - (22149) एर्नाकुलम-पुणे, (22115), (22655) निजामुद्दीन मार्ग
3) 10 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - एलटीटी-करमळी, एर्नाकुलम-हजरत
4) 11 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - (11099) एलटीटी-मडगाव, (22114) तिरुवनंतपूरम-एलटीटी
5) 12 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - (11099) एलटीटी-मडगाव, (22149) एर्नाकुलम-पुणे
6) 13 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - (11099) एलटीटी-मडगाव
7) 14 डिसेंबर मध्यरात्रीनंतर - (22149) दौंड-ग्वालियर
या सर्व गाड्या ठरलेल्या वेळेपेक्षा विलंबाने धावणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवसरात्र सुरू असलेल्या कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पाच्या आधुनिक सुविधांमुळे भविष्यात पनवेल परिसरातील रेल्वे सेवांचा वेग आणि क्षमतेत मोठी वाढ होणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
