भुयारी मार्ग सुरु मात्र...
भुयारी मार्ग सुरु झाला असला तरी वापरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जड बॅगा, ट्रॉलीसह प्रवास करणे कठीण झाले आहे, कारण येथे अपुरी सोय आहे. लिफ्ट, रॅम्प किंवा स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना विशेष त्रास होतो.
प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय असला तरी आवश्यक सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना तो अर्धवट वाटतो. लोकांना भुयारी मार्ग वापरताना त्रास होत असल्याची तक्रार सतत येत आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा प्रवाशांची समस्या कायम राहिल. संपूर्णपणे भुयारी मार्गा सुरु केला हा प्रवाशांसाठी एक दिलासा आहे पण सोयी-सुविधा न मिळाल्यामुळे हा निर्णय अद्याप पूर्णतहा कार्यक्षम ठरलेला नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Railway Station : पनवेल स्थानकातील गर्दीचं टेन्शन मिटलं, सुरू झाला खास मार्ग, कसा होणार फायदा?
