प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद
प्रवासाला निघालेल्या प्रवाशांसोबत कुटुंबीय आणि नातेवाईक देखील स्टेशनवर येतात, त्यामुळे गर्दी आणखी वाढते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
वाहनधारकांना मोठा दिलासा! इतर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही मिळणार पुण्यात HSRP नंबर प्लेट
सुरक्षेसाठी विशेष उपाय योजना
गर्दीचा ताण लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. प्रवाशांना जास्त वेळ थांबू नये यासाठी सूचना दिल्या जात आहेत, तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे सातत्याने घोषणाही केल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होईल आणि गर्दीचे व्यवस्थापन करता येईल.
ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांसाठी सूट
मध्य रेल्वेने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांसोबत असलेल्या प्रवाशांना विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या पालक किंवा नातेवाईकांना वैध प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी या नवीन नियमांचे पालन करावे आणि आपल्या सहकार्याने होळीच्या गर्दीतही प्रवास अधिक सुरक्षित व सुकर होईल, असे आवाहन केले आहे.