वाहनधारकांना मोठा दिलासा! इतर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही मिळणार पुण्यात HSRP नंबर प्लेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यांतील वाहनधारकांनाही आता पुण्यात उच्च सुरक्षा पाटी उपलब्ध होणार आहे.
पुणे : एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या वाढून वेळेअभावी एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी फिटमेंट सेंटरची संख्या वाढवली जाणार आहे. शिक्षण, नोकरी आणि उद्योग व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यांतील वाहनधारकांनाही आता पुण्यात उच्च सुरक्षा पाटी उपलब्ध होणार आहे.
यादृष्टीने फिटमेंट सेंटर वाढवा, तसेच सोसायटी, कंपनी अथवा एकाच ठिकाणी 25 पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या वाहनांना होम डिलिव्हरी शुल्क घेऊ नका, अशा सूचना आरटीओकडून रोझमार्टा कंपनीला देण्यात आल्या आहेत. काही फिटमेंटचालक वाहनधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, फिटमेंट सेंटर बंद करत आहेत. यामुळे ज्येष्ठांना हेलपाटे मारावे लागत असून, हा प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
advertisement
परिवहन विभागाने वाहनधारकांना 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यभरातील नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची वाहने इतर शहरांमध्ये नोंदणी केलेली असल्याने त्यांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्यास अडचणी येत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी पुण्यात सेंटर वाढविण्यात येणार आहेत. वाहनधारकांनी यानुसार आता एचएसआरपी नोंदणी करताना पुणे सेंटर निवडून हा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात वापरत असलेल्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी दिलासा मिळणार आहे.
advertisement
पुण्यात जवळपास 25 लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. सध्या पुण्यात 125 फिटमेंट सेंटर सुरू आहेत. पण, ती वाहन संख्येच्या दृष्टीने पुरेशी नाहीत. त्यामुळे एचएसआरपी बसविण्यासाठी खूप वेळ लागत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 12, 2025 10:34 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
वाहनधारकांना मोठा दिलासा! इतर जिल्ह्यातील वाहनधारकांनाही मिळणार पुण्यात HSRP नंबर प्लेट