पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनानिमित्त PMP च्या 66 मार्गांत बदल
मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये, विसर्जनासाठी चौपाट्या, नैसर्गिक तलाव आणि 288 कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेने अनेक सेवा सुविधाही पुरवल्या आहेत. चौपाट्यांवर समुद्रकिनारी ‘ब्लू बटन जेलीफिश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर लक्षात घेऊन मत्स्यदंश होणार नाही, याची काळजी विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्तांनी घ्यावी, असे आवाहन सुद्धा पालिकेने नागरिकांना केले आहे. कृत्रिम तलावांची माहिती मिळवण्यासाठी महानगर पालिकेने क्यू आर कोडचीही सोय केली आहे. त्या कोडवर भाविकांना आपल्या घराजवळ कृत्रिम तलाव कुठे आहे? किती दूर आहे? अशी सर्व माहिती मिळेल.
advertisement
गणेशोत्सवातही 'ऑपरेशन सिंदूर'चा जलवा, एरंडवणेतील देखावा बघून चढेल स्फुरण, VIDEO
संपूर्ण महानगर पालिका क्षेत्रामध्ये, एकूण 288 कृत्रिम तलावांची आणि नैसर्गिक तलावांची सोय करण्यात आलेली आहे. कृत्रिम तलावांवर 6 फूट उंचीच्या मुर्तींना विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, तलावातील पाण्याची पातळी मुर्तींच्या उंचीप्रमाणेच ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबईत रविवारी पाच दिवसांच्या एकूण 36 हजार 672 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या 36 हजार 672 मूर्तींमध्ये पीओपीच्या 23 हजार 204, तर शाडूच्या 13 हजार 468 मुर्तींचा समावेश आहे. तसेच समुद्र आणि नैसर्गिक तलावांत सहा फुटांवरील पीओपीच्या 13 आणि शाडूच्या 22, अशा एकूण 135 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
विद्येच्या माहेरघरात झाडांची वर्णमाला, गणेशोत्सवात साकारला अनोखा देखावा, Video
गिरगाव, दादर आणि माहीमसह आदी चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीवरक्षकांसह मोटारबोटी तैनात केल्या आहेत. मूर्ती विसर्जनासोबत भाविकांनी आणलेले आणि अर्पण केलेले हार, फुले आदी निर्माल्य जमा करण्यासाठी 163 निर्माल्य कलशांसह 274 निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था केली आहे. प्रथमोपचार केंद्रांसह रुग्णवाहिका सज्ज झाल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांसह प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.