11 ते 17 जानेवारी 2025 म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. दरवर्षी एक आठवडा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जात आहे. रस्ते सुरक्षेबद्दल अमृता माने ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. बालपणीची रायडींगची आवड जपत अमृताने 21 व्या वर्षी फावल्या वेळेत रायडिंग शिकून घेतली. मात्र जेव्हा अमृताला दुचाकी चालवायची होती, तेव्हा तिला दुचाकी वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देणाऱ्या महिला प्रशिक्षक यांची कमतरता जाणवली. हीच कमतरता समाजात प्रत्येक महिलेला कुठे ना कुठे जाणवत असेल, हाच विचार डोक्यात ठेवून अमृताने वुमन ऑन विल्स हा तिचा ग्रुप सुरू केला.
advertisement
"आतापर्यंत आपण अनेक महिला दुचाकी चालवताना पाहिल्या आहेत, मात्र कुठेतरी प्रत्येक महिलेमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि त्याचे मुख्य कारण असते ते म्हणजे तिला आजूबाजूचे सांगणारे लोकं. की, तू महिला असून वाहन चालवू शकत नाही. त्यामुळे हीच चौकट कुठेतरी मोडायची होती म्हणून मी जास्तीत जास्त महिलांना दुचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देते' असं अमृताने लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
ती पुढे म्हणाली की, 'या प्रशिक्षणा अंतर्गत मी महिलांना नेहमी स्वतःची सुरक्षा आणि गाडी चालवताना रोडवर असतात त्यांची देखील सुरक्षा बाळगण्याचे धडे देते. उदाहरणार्थ जेव्हा आमच्या रायडींग ग्रुपमध्ये कोणतीही मुलगी किंवा महिला प्रवेश घेते तेव्हा आम्ही हेल्मेट अनिवार्य आहे, अशी अट त्यांच्यासमोर ठेवतो. जेणेकरून रोड सेफ्टीची सुरुवात इथूनच होते. याशिवाय आपण जेव्हा रोडवर गाडी चालवतो, तेव्हा आपल्या चारही बाजूला गाड्या असतात त्यामुळे चारही बाजूला योग्य पद्धतीने बघून आणि चौकस लक्ष ठेवून नेहमी गाडी चालवली पाहिजे, असं आम्ही आमच्या प्रशिक्षणात प्रत्येक महिलेला सांगतो"
अमृताने सुरू केलेल्या वुमन ऑन विल्स या संकल्पनेनंतर अनेक महिलांचा दुचाकी चालवण्याचा आत्मविश्वास द्विगुणीत तर झालाच आहे, मात्र महिला या उत्तम चालक असतात तसंच त्या गाडी आणि स्वतःची सुरक्षा या दोन्ही गोष्टी अगदी नीटपणे सांभाळू शकता. याचं उदाहरण समाजासमोर उभं केलं आहे.
#NationalHighwaysAuthorityofIndia #NHAI #MinistryOfRoadTransportAndHighways #MORTH
#NitinGadkari