TRENDING:

मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?

Last Updated:

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज असलेले ढोल पथक देखील यात मागे नाहीत. मुंबईच्या बोरिवलीमधील सृजन ढोल पथकाने महिला सुरक्षा जनजागृतीसाठी उपक्रम राबवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी, प्रतिनिधी
advertisement

मुंबई : महाराष्ट्राला अनेक वर्षांपासून ढोल पथकाची परंपरा लाभली आहे. गेल्या काही वर्षांपासून ढोल पथकांचे वादन आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. सण उत्सवावत ढोल पथक लक्षवेधी ठरतात. त्यात ढोल पथकाच्या माध्यमातून वादक मंडळी नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा मानस ठेवतात. असाच आणखी एक प्रकार पाहावयास मिळत आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे. बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज असलेले ढोल पथक देखील यात मागे नाहीत. मुंबईच्या बोरिवलीमधील सृजन ढोल पथकाने महिला सुरक्षा जनजागृतीसाठी उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात ढोल पथक वादनाच्या दरम्यान महिला सुरक्षेवर आधरित पथनाट्य सादर केले जात आहे.

advertisement

Diksha Kapoor Success Story : एकाच वेळी मिळवल्या 6 सरकारी नोकऱ्या, कोण आहे ही तरुणी?, Photos

सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. या उपक्रमातून महिलांसोबत होणाऱ्या चुकीच्या घटनांचा आढावा घेण्यासोबतच, महिलांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी स्वतःच्या सुरक्षेबाबत कसे जागरूक व्हावे या मुद्द्याला जास्त अधोरेखित करण्यात आले आहे. एक स्त्री खूप काही करू शकते. ती किती सक्षम आहे, या सर्व गोष्टी या पथनाट्यातून सादर करण्यात आल्या आहेत.

advertisement

गौरी गणपतीसाठी ट्रेडिंग दागिने हवेत?, दादरमध्ये याठिकाणी मिळतायेत अगदी स्वस्तात, VIDEO

गणेशोत्सव होईपर्यंत ज्या, ज्या ठिकाणी सृजन ढोल पथकाची टीम वादन करेल, त्या सर्व ठिकाणी त्यांचं पथनाट्य देखील सादर होईल. एकंदरीतच वादनासोबतच जनजागृतीचा आगळावेगळा उपक्रमाचा यंदाच्या वर्षी राबवण्यात आला आहे. त्यांच्या या उपक्रमाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे, तसेच त्यांच्या या उपक्रमाचे सगळेजण कौतुक करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत ढोल पथकाच्या टीमचं कौतुकास्पद कार्य, पथनाट्याच्या माध्यमातून करताय जनजागृती, काय आहे विषय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल