गौरी गणपतीसाठी ट्रेडिंग दागिने हवेत?, दादरमध्ये याठिकाणी मिळतायेत अगदी स्वस्तात, VIDEO

Last Updated:

या दागिन्यांमध्ये कमरपट्टा आणि ठुशीमध्ये देखील खूप व्हरायटीही उपलब्ध आहे. तुम्हालाही तुमच्या गौराईचा लूक ट्रेंडिंग करायचा असेल तर तुम्ही दादर मार्केटमध्ये भेट नक्की भेट देऊ शकता आणि तुमच्या गौराईला सुंदर दागिन्यांनी सजवू शकता.

+
दादर

दादर मार्केट

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : सध्या गौरी गणपतीचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. दादर मार्केटमध्येही गौरी गणपतीच्या सजावटीसाठी लागणारे सगळे दाग दागिने उपलब्ध झाले आहेत. अगदी नथपासून ते पैजणांपर्यंत सगळ्या दागिन्यांची रेलचेल सध्या दादर मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे.
दादरमधील श्रीजी आर्ट गॅलरी या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे गौरीचे दागिने आलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्रही उपलब्ध आहेत. यामध्ये एक पट्टी, दोन पट्टी असे सगळे मंगळसूत्र मिळतात. या मंगळसूत्रांची किंमत फक्त 250 ते 300 रुपयांपासून सुरू होते आहे. त्यासोबतच इथे छोट्या नथपासून ते मोठ्या नथपर्यंत दागिने याठिकाणी उपलब्ध झाले आहेत.
advertisement
सोलापुरात लाल मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ, किंमतीही लक्षवेधी, काय आहे यात स्पेशल?
या सगळ्या नथीची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते. नथी सोबतच इथे गौराईला घालण्यासाठी वेगवेगळे ट्रेंडिंग हारसुद्धा आलेले आहेत. या हारांमध्ये मोतीहार, राणीहार, कोल्हापुरी साज, तुळजापूरच्या तुळजाभवानीचा साज, असे सगळे दागिने मार्केटमध्ये आले आहेत. यामध्ये तुम्ही जर पुर्ण सेट घ्यायला गेलात तर त्याची किंमत फक्त 750 ते 800 आहे. मात्र, जर तुम्हाला फक्त एखादा दागिना हवा असेल तर तुम्हाला तो 200 ते 250 पर्यंत मिळेल. तुम्हाला तुमच्या गौराईचा लूक ज्या देवीप्रमाणे करायचा असेल तशाप्रमाणे तुम्ही दागिन्यांची खरेदी करू शकता.
advertisement
या दागिन्यांमध्ये कमरपट्टा आणि ठुशीमध्ये देखील खूप व्हरायटीही उपलब्ध आहे. तुम्हालाही तुमच्या गौराईचा लूक ट्रेंडिंग करायचा असेल तर तुम्ही दादर मार्केटमध्ये भेट नक्की भेट देऊ शकता आणि तुमच्या गौराईला सुंदर दागिन्यांनी सजवू शकता.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
गौरी गणपतीसाठी ट्रेडिंग दागिने हवेत?, दादरमध्ये याठिकाणी मिळतायेत अगदी स्वस्तात, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement