सोलापुरात लाल मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ, किंमतीही लक्षवेधी, काय आहे यात स्पेशल?

Last Updated:

याठिकाणी इको फ्रेंडली गणपती म्हटलं की, गणेश युग यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. गणेश युग यांच्या लालमाती पासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ सध्या शहरात दिसून येत आहे.

+
लाल

लाल मातीच्या गणपतीच्या मूर्ती

इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : श्री गणेशाचे आगमन अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपले आहे. यासाठी गणेश भक्तांमध्ये आतुरता आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सोलापुरात सध्या शहरात इको फ्रेंडली गणपती खरेदी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी गर्दी करत आहे.
याठिकाणी इको फ्रेंडली गणपती म्हटलं की, गणेश युग यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. गणेश युग यांच्या लालमाती पासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ सध्या शहरात दिसून येत आहे. विविध आकारातील आणि मुद्रेतील गणपती बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. याबाबत अधिक माहिती विकास गोसावी यांनी दिली.
advertisement
गणपती बाप्पा 7 सप्टेंबर रोजी घरोघरी विराजमान होणार आहेत. याठिकाणी लालमाती पासून बनवलेल्या गणपतीमध्ये सिद्धिविनायक, लालबाग, दगडूशेठ, टिटवाळा, नाना पाटेकर, शुर्पकर्ण आदिंसह विविध मुद्रेतील बाप्पा भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर सर्व मूर्तींवर नैसर्गिक रंग वापरण्यात आले आहेत. 500 रुपयांपासून ते 9 हजार रुपयापर्यंत या मूर्तीचे दर आहेत.
advertisement
शाडू व लाल मातीपासून बनवलेले इको फ्रेंडली गणपती भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरत आहेत. 6 इंच ते अडीच फुटापर्यंतच्या गणपती मूर्ती मूर्तिकार गणेश गोसावी बनवल्या आहेत. यामध्ये 120 प्रकारचे विविध मुद्रेतील गणपती बाप्पांचे मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
advertisement
2 BHK फ्लॅटची किंमत 60 लाख रुपये, तरीही लोकांची मोठी पसंती; छत्रपती संभाजीनगरमधील हा परिसर कोणता? VIDEO
सुमारे एक गणपती बनवण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. अवध्या अर्ध्या तासांमध्ये या गणपतीचे घरामध्येच विसर्जन करता येऊ शकते. आजपर्यंत 350 पेक्षा जास्त मूर्तीची बुकिंग कऱण्यात आली आहे. तर या मूर्ती विक्रीच्या व्यवसायातून 7 ते 8 लाखांची उलाढाल होणार असल्याची माहितीही मूर्तिकार गणेश गोसावी यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलापुरात लाल मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची क्रेझ, किंमतीही लक्षवेधी, काय आहे यात स्पेशल?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement