Chhatrapati Sambhajinagar : महिलेनं व्यवसाय करायचं ठरवलं, पतीनेही नोकरी सोडत दिली साथ, आज महिन्याला 1 लाख रुपयांचं उत्पन्न, VIDEO

Last Updated:

ज्योती यांचे पती एका खासगी कंपनीमध्ये कामाला होते. पण ज्योती यांनी व्यवसायामध्ये आपल्या पतीची मदत हवी होती. त्यामुळे त्यांच्या पतीने नोकरी सोडत दोघांनी मिळून हा व्यवसाय पुढे नेण्याचा ठरवले.

+
ज्योती

ज्योती महेंद्र जवरास

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपण स्वतःचा एखादा व्यवसाय करावा. आपल्या पायावर उभे राहावे, जेणेकरून आपल्या कुटुंबालाही आपला हातभार लागेल. आज अशाच एका महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनीही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा ठरवले आणि इतकेच नव्हे तर आज महिला त्या व्यवसायातून चांगली कमाईसुद्धा करत आहेत. जाणून घेऊयात, या महिलेची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
ज्योती महेंद्र जवरास या महिलेची ही कहाणी आहे. त्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रहिवासी आहेत. त्यांनाही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करायचा होता. म्हणून त्यांनी स्वतःचा वाती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. आधी घरातूनच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. मग त्यानंतर त्यांनी एका बचत गटाची स्थापना केली. त्यामध्ये त्या सुरुवातीला फक्त 100 रुपये बचत करायच्या. त्यानंतर त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाबद्दल माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी त्याठिकाणी त्यांच्या बचत गटासाठी कर्ज घेण्याचे ठरवले. त्यांना सुरुवातीला फक्त एक लाख रुपये मिळाले. त्यात त्यांच्याही वाट्याला यापैकी फक्त 10 हजार रुपये आले.
advertisement
2 BHK फ्लॅटची किंमत 60 लाख रुपये, तरीही लोकांची मोठी पसंती; छत्रपती संभाजीनगरमधील हा परिसर कोणता? VIDEO
या पैशातून त्यांनी आपला व्यवसाय वाढवण्याचे ठरवले आणि त्यांनी व्यवसाय वाढवला. सुरुवातीला त्या वाती करायच्या आणि नातेवाईकांना, शेजारच्या लोकांना त्यांनी विकायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बाजारात जाऊन विक्री करण्याचे ठरवले. ज्योती यांचे पती एका खासगी कंपनीमध्ये कामाला होते. पण ज्योती यांनी व्यवसायामध्ये आपल्या पतीची मदत हवी होती. त्यामुळे त्यांच्या पतीने नोकरी सोडत दोघांनी मिळून हा व्यवसाय पुढे नेण्याचा ठरवले आणि मग सुरुवातीला सायकलवर जाऊन बाजारात त्यांनी आपला माल विकायला सुरुवात केली.
advertisement
Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO
हळूहळू त्यांच्या वातींना मोठ्या प्रमाणात मागणी यायला लागली. आता त्यांच्याकडे तब्बल 20 प्रकारच्या वातीचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यांच्या या उत्पादनांना शहरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण राज्यामधूनही मागणी आहे. त्यांनी या व्यवसायामधून आपले एक चांगले घर बांधले. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षणही या व्यवसायाच्या कमाईतूनच केले. आज त्यांच्याकडे पाच महिला या कामाला आहेत आणि त्या साधारणपणे महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न कमावत आहेत.
advertisement
या व्यवसायामध्ये मला माझ्या पतीने खूप मुलाची साथ दिली आहे. त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि ते माझ्यासोबत या व्यवसायामध्ये उतरले. आज आम्ही दोघेही जण चांगल्या रीतीने हा व्यवसाय करत आहोत आणि आम्ही इतरांना रोजगार देऊ शकत आहोत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मी माझ्या पतीचे यासाठी खूप मनापासून आभार मानते, अशा भावना त्यांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या. त्यांचा हा प्रवास निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar : महिलेनं व्यवसाय करायचं ठरवलं, पतीनेही नोकरी सोडत दिली साथ, आज महिन्याला 1 लाख रुपयांचं उत्पन्न, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement