TRENDING:

Pune Porsche Accident Updates : porsche कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सोडा, कोर्टाचे पुणे पोलिसांना आदेश

Last Updated:

Pune Porsche Accident Updates : देशभरा गाजत असलेल्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, (अजित मांढरे, प्रतिनिधी) : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. घटनेतील अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामिन मंजूर केला आहे. मुलाला आत्याच्या ताब्यात देण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत.
News18
News18
advertisement

अल्पवयीन मुलाला अखेर जामीन

जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. मुलाची आत्या पूजा जैननं हिबियस कॉर्पस (Hebious corpus) अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला आहे. त्यामुळे बालसुधारगृहातून अल्पवयीन आरोपीची सुटका होणार आहे. तब्बल 33 दिवसानंतर अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहातून बाहेर येणार आहे.

advertisement

काय होती याचिका?

अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतरही त्याला बेकायदेशीररित्या बालसुधारगृहात डांबल्याचा आरोप मुलाच्या आत्याने हायकोर्टात केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी आपला निर्णय जाहीर करत अल्पवयीन मुलाला जामीन दिला आहे.

वाचा - पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! म्हणाले..

advertisement

काय आहे प्रकरण?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचेच्या विकरांवर गुणकारी, घरीच बनवा सोप्या पद्धतीने आयुर्वेदिक साबण, Video
सर्व पहा

17 वर्षे 8 महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी 160 किमीच्या वेगाने पोर्श कार चालवून एका तरुण तरुणीला उडवले होते. ही धडक इतकी जोरात होती की यातील तरुणी हवेत उडून रस्त्यावर आपडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला होता तर तरुणाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाला 300 ओळींचा निंबध लिहिण्याची शिक्षा देऊन तात्काळ जामीन देण्यात आला होता. यानंतर सोशल मीडियावरम मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. तर विरोधी पक्षातील नेत्यांनीही हे प्रकरण लावून धरलं होतं. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जामीन नाकार पुन्हा एकदा ताब्यात घेऊन बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. तब्बल 33 दिवस अल्पवयीन आरोप बालसुधारगृहात होता.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Pune Porsche Accident Updates : porsche कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सोडा, कोर्टाचे पुणे पोलिसांना आदेश
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल