रेल्वेत नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार
रेल्वे भरती बोर्डाने आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून एकूण 312 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, चीफ लॉ असिस्टंट, पब्लिक प्रोसिक्युशन, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टर तसेच स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर अशा विविध पदांचा समावेश आहे.
advertisement
या भरती मोहिमेत सर्वाधिक जागा ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी आहेत. या पदासाठी तब्बल 202 जागा उपलब्ध आहेत. याशिवाय चीफ लॉ असिस्टंटसाठी 22 जागा, पब्लिक प्रोसिक्युशनसाठी 7 जागा, सीनियर पब्लिक इन्स्पेक्टरसाठी 15 जागा तर स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरसाठी 24 जागा ठेवण्यात आल्या आहेत.
कधी पर्यंत करता येणार अर्ज?
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जानेवारी 2026 पूर्वी आपला अर्ज सादर करावा. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या नोकरीसाठी साधारणपणे 30 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार मिळणार आहे. काही पदांसाठी 35,400 रुपये तर चीफ लॉ असिस्टंटसारख्या पदांसाठी 44,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल. यासोबतच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारख्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे.
