मुंबई हायकोर्टात PA पदाची भरती, शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा अर्ज
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीमध्ये 325 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये, पदवीधर, टेक्निशियन आणि ट्रेड या पदांसाठी अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरू आहे. या पदांसाठी वयोमर्यादा जास्तीत जास्त २५ असून कमीत कमी १८ आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी वयाच्या 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. तर, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा हे नोकरीचं ठिकाण असणार आहे. आरसीएफएल कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपची असलेली अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे.
advertisement
पश्चिम- मध्य रेल्वेमध्ये मेगा भरती, प्रशिक्षणार्थी विद्यार्थांसाठी मोठी नोकरीची
29 ऑगस्टपासून सुरू झालेली ऑनलाईन भरती प्रक्रियेची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे. 12 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात. महत्वाची बाब म्हणजे, अर्ज भरताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज भरावे लागणार नाही. अर्ज फी नाहीये. पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी 50% गुणांसह B.Com/ BBA/ अर्थशास्त्रात पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिससाठी 50% गुणांसह (Chemical/ Civil/ Computer/ Electrical/ Instrumentation/ Mechanical) या विभागागातील इंजिनिअरिंग डिप्लोमा व्हायला हवा.
सोनं पुन्हा महागणार? पुण्यातील सराफा व्यापाऱ्याने सांगितलं कारण Video
तर, ट्रेड अप्रेंटिससाठी 50% गुणांसह (Physics, Chemistry, Mathematic) या विषयात B.Scची पदवी किंवा 12वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे. पदवीधर अप्रेंटिस साठी 115, टेक्निशियन अप्रेंटिस साठी 114 आणि ट्रेड अप्रेंटिस साठी 96 पदांची संख्या आहे. नोकरीबद्दलच्या माहितीमध्ये पगाराबद्दल माहिती दिलेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीखसाठी अद्याप बराच उशीर असला तरीही पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, ज्यात पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि इतर महत्वाच्या सूचनांचा तपशीलवार उल्लेख असेल.