Gold Silver Rate: सोनं पुन्हा महागणार, 110000 पार जाणार? पुण्यातील सराफा व्यापाऱ्याने सांगितलं कारण, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Gold Silver Rate: सध्या सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. पुण्यातील सराफा व्यापाऱ्याने याबाबत माहिती दिलीये.
पुणे : ऐन सणासूदीच्या काळात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अमेरिकेने लादलेला अतिरिक्त कर, जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि शेअर मार्केटमधील घसरण या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सराफ बाजारातही या वाढीचा परिणाम दिसून येत आहे. सध्या सोन्याचे भाव काय आहेत आणि येत्या काही काळात ते कितीने वाढू शकतात, याबाबत पुण्यातील सराफ व्यापारी ललित मेहता यांनी लोकल 18 माहिती दिली आहे.
पुण्यातील सराफा बाजारात शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 94 हजार 500 रुपये होता, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 2 हजार 300 रुपये इतका होता. शनिवारी मात्र 22 कॅरेट सोनं 96 हजार 900 रुपयांवर गेले असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 3 हजार 200 रुपयांपर्यंत वाढला आहे. सोन्याच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. हा भाव 1 लाख 10 हजारापर्यंत येत्या काळात जाऊ शकतो, असे व्यापारी ललित मेहता यांनी सांगितले आहे.
advertisement
सोन्याची किंमत का वाढत आहे?
सध्या सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता, अमेरिकेने लादलेला अतिरिक्त कर, ढासळत चाललेला शेअर बाजार, आणि जगभरातील युद्धजन्य परिस्थिती यांचा मोठा प्रभाव आहे. या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत, आणि त्यासाठी सोन्यात गुंतवणूक वाढवली जात आहे. ही वाढती मागणी थेट सोन्याच्या किमतींवर परिणाम करत आहे.
advertisement
सोन्याचा दर कसा ठरतो?
सोन्याचे दर दररोज ठरवले जातात आणि त्यावर अनेक घटक परिणाम करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने अमेरिकन डॉलरमध्ये खरेदी-विक्री होते. त्यामुळे डॉलरच्या बदलत्या किमतीचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या भावावर होतो.
भारतातील बहुतेक सोने आयात केले जाते. त्यामुळे आयात शुल्क, जीएसटी आणि स्थानिक करही किमतीत वाढ किंवा घट घडवू शकतात. याशिवाय, जागतिक परिस्थितीही महत्त्वाची भूमिका बजावते. युद्ध, आर्थिक मंदी, व्याजदरातील बदल किंवा बाजारातील अनिश्चितता या सर्व गोष्टींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होतो. विशेष म्हणजे, अनिश्चित काळात गुंतवणूकदार सोने सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करतात. त्यामुळे मागणी वाढल्यास सोन्याचा भावही वाढतो.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 31, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Rate: सोनं पुन्हा महागणार, 110000 पार जाणार? पुण्यातील सराफा व्यापाऱ्याने सांगितलं कारण, Video

