Bombay High Court Bharti 2025 : मुंबई हायकोर्टात PA पदाची भरती, शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टामध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्वीय सहाय्यक पदासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी आहे.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. मुंबई हायकोर्टामध्ये पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्वीय सहाय्यक पदासाठी (Personal Assistant) मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरी आहे. 18 ऑगस्टपासून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही वेळ न दवडता मुंबई हायकोर्टात स्वीय सहाय्यक पदासाठी अर्ज करा. कारण, या भरतीसाठीचा शेवटचा दिवस उद्याचा (01 सप्टेंबर) आहे. त्यामुळे लगेचच अर्ज करा. नक्की शैक्षणि पात्रता, वयाची अट काय आहे ? जाणून घेऊया...
मुंबई उच्च न्यायालयाने (BHC Bharti 2025) स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एकूण जागा 36 आहेत. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 18 ऑगस्टपासून स्वीय सहाय्यक पदाच्या भरतीसाठी सुरूवात झाली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस उद्याचा आहे. उद्या (01 सप्टेंबर) संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करू शकता. जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी नक्कीच या पदासाठी अर्ज करू शकता.
advertisement
मुंबई उच्च न्यायालयातील भरतीसाठी उमेदवाराकडे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे कायद्याची पदवी (Law Degree) असेल, त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. तसेच, उमेदवाराला उच्च न्यायालयात 8 ते 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय, शॉर्ट हँड 120 श.प्र.मि आणि इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. या दोन परीक्षाही उमेदवार उत्तीर्ण हवा. तरच तुम्ही उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता. अर्जदाराचे वय जास्तीत जास्त वय 38 वर्षे असून कमीत कमी वय 21 वर्षे आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
advertisement
https://bhc.gov.in/bhcparecruit2025/recruitment.php या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज भरल्यानंतरच तुम्हाला परिक्षेसाठी हॉलतिकिट प्राप्त होईल. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला अर्ज भरणं अनिवार्य आहे. या पदासाठी उमेदवाराची निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे. स्वीय सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67700- 2,08,700 रुपये वेतन मिळेल. पदासाठी शॉर्टहँड आणि टायपिंग चाचणी प्रत्येकी ४० गुणांची अशी परीक्षा पद्धत असेल. तर, मुलाखत (Viva-voce) २० गुणांची असेल. शॉर्टहँड व टायपिंग चाचणीसाठी किमान उत्तीर्ण गुण प्रत्येकी २० असतील आणि मुलाखतीसाठी ०८ गुण असतील.
advertisement
शॉर्टहँड लिप्यंतर व टायपिंग चाचणी संगणकावर घेतली जाईल. शॉर्टहँड डिक्टेशन टेस्ट उत्तीर्ण झालेला उमेदवारच टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरेल आणि टायपिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यास उमेदवाराला मुलाखतीसाठी पात्र ठरवले जाईल. स्वीय सहाय्यक पदासाठी असलेली परीक्षा तीन भागांत होणार आहे. पहिला भागात 40 गुणांची शॉर्टहँड परीक्षा, दुसऱ्या भागात 40 गुणांची टायपिंग परीक्षा तर तिसऱ्या भागात 20 गुणांची मुलाखत होईल. सर्व परीक्षांचे वेळापत्रक, स्थळ, मुलाखत आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://bombayhighcourt.nic.in प्रदर्शित केले जातील. उमेदवार आपले हॉलटिकिट/ प्रवेशपत्र शॉर्टहँड डिक्टेशन टेस्ट, टायपिंग टेस्ट व मुलाखतीसाठी त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलमधून डाउनलोड करू शकतील. उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला देण्यात येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bombay High Court Bharti 2025 : मुंबई हायकोर्टात PA पदाची भरती, शेवटची तारीख आली जवळ; लगेचच करा अर्ज