Ganeshotsav 2025: ग्लोबल बाप्पा! परदेशी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाची भुरळ! 500 जणांचा अनोखा हेरिटेज वॉक
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ganeshotsav 2025: पुण्यात ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 500 हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पुणे: महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुण्यातील गणेशोत्सवाला देखील ऐतिहासिक परंपरा असून हा उत्सव जगप्रसिद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्र प्रथम ट्रस्ट आणि सदैव फाउंडेशनच्या माध्यमातून ग्लोबल गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आणि गणपती दर्शनचे आयोजन केले. यात 500 परदेशी विद्यार्थी सहभागी झाले होते. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना ऋषिकेश कायत यांनी दिली.
पुण्यातील राष्ट्र प्रथम ट्रस्ट आणि सदैव फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरात शिकणाऱ्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आणि गणपती दर्शनाचा उपक्रम घेण्यात आला. पुणे शहरातील 500 हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर येथून हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली. त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेऊन परदेशी विद्यार्थ्यांनी या मंदिराचा इतिहास जाणून घेतला.
advertisement
श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडा यांचेकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक परदेशी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.पुणे शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती उत्सव मंडपात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांनी मूळ मंदिराचा इतिहास जाणून घेतला. भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब रंगारी भवन आणि स्वातंत्र्य लढ्याची चळवळ जाणून घेतली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची भव्यता अनुभवत आरती केली.
advertisement
या देशातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
परदेशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जगभरातील विविध देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, युगांडा, म्यानमार, नेपाळ, भूतान, कझाकिस्थान या देशातील जवळपास 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 31, 2025 4:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: ग्लोबल बाप्पा! परदेशी विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाची भुरळ! 500 जणांचा अनोखा हेरिटेज वॉक








