TRENDING:

मुंबईकरांच्य जीवाशी खेळ! फळांवर उंदीर मारण्याचं औषध; मालाडमधील विक्रेत्याचा धक्कादायक प्रकार, VIDEO

Last Updated:

मालाडमध्ये फळांवर Ratol क्रीम लावल्याचा प्रकार उघड; विक्रेत्याचं दुकान सील, नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, प्रतिनिधी विजय वंजारा: हेल्दीच्या नावाखाली तुम्ही विष तर खात नाही ना? सावधान तुम्ही बाजारातून फळं घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमची एक छोटी चूक कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते. चक्क फळांवर विषारी औषध लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मालाडमधून समोर आला आहे. उंदीर मारण्याचं औषध हे फळांना लावलं जात होतं. या फळ विक्रेत्याने ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
News18
News18
advertisement

नेमकं घडलं काय?

मालाडच्या एका गजबजलेल्या भागात विक्रेता फळं विकत होता. उंदरांपासून फळं वाचवण्यासाठी या पठ्ठ्याने डोकं चालवलं, पण ते लोकांच्या जीवावर बेतणारं ठरलं. फळांवर Ratol क्रीम लावताना काही जागरूक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडलं. लोकांनी जेव्हा त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून नागरिक अवाक झाले. उंदीर नुकसान करतात, म्हणून हे लावलंय,असं त्याने निर्लज्जपणे सांगितलं.

advertisement

डॉक्टरांच्या मते, हे औषध किती घातक आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही. फळं धुवून खाल्ली तरी त्या विषाचा अंश सालीवाटे आत जाऊ शकतो. यामुळे तीव्र पोटदुखी, उलट्या आणि यकृताचे कायमचे आजार होऊ शकतात. जर एखादं लहान मूल हे फळ खातं, तर त्याच्यासाठी हे जीवघेणं ठरू शकतं. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्याचं दुकानं सील करण्यात आलं आहे. मात्र या फळविक्रेत्याचा कारनामे पाहून मालाडच्या नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

advertisement

या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित प्रकरणात अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मालाडमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

[video width="480" height="848" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/02/WhatsApp-Video-2026-02-25-at-8.53.56-AM-2026-02-c6d34b2097d4a70d256d0617b895e412.mp4"][/video]

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
सर्व पहा

दरम्यान, या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या फळांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे संबंधित प्रकरणात अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मालाडमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांच्य जीवाशी खेळ! फळांवर उंदीर मारण्याचं औषध; मालाडमधील विक्रेत्याचा धक्कादायक प्रकार, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल