भिवंडीच्या देवनगरमध्ये ही हाणामारी झाली आहे. मोबाईल फोनवरून दोन कुटुंबांमध्ये भांडण झालं ज्यामुळे इमारतीचंही नुकसान झालं आहे. मोइनुद्दीन नसरुद्दीन शेख आणि नुरुद्दीन इमामुद्दीन शेख यांच्या कुटुंबामध्ये मोबाईल फोनवरून वाद सुरू झाला यानंतर एकमेकांना शिविगाळ केली गेली, त्यानंतर हाणामारीला सुरूवात झाली. हा वाद नंतर इतका वाढला की दोन्ही कुटुंबातील सदस्य त्यांच्या इमारतीमधून शेजारच्या घराच्या छतावर गेले.
advertisement
शेजारच्या घराच्या छतावर हाणामारी सुरू असतानाच छत कोसळले आणि पाच जण खाली गेले. या हाणामारीमध्ये 8 ते 10 महिला आणि पुरुष होते. या अपघातामध्ये कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, पण घराच्या मालकाचं मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याप्रकरणी भायवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
April 06, 2025 6:34 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bhiwandi : तुफान हाणामारी सुरू असताना अचानक गायब झाले 5 जण, भिवंडीचा शॉकिंग Video