रेल्वेमध्ये ही जम्बो भरती असून नोकरीच्या शोधात असणार्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. चला तर जाणून घेऊया, कोणकोणत्या पदासाठी पश्चिम- मध्य रेल्वेमध्ये नोकरीच्या संधी आहेत...
कोकण रेल्वेमध्ये 80 जागांसाठी विविध पदांसाठी भरती, थेट होणार मुलाखत; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
पश्चिम- मध्य रेल्वेमध्ये, फिटर, टर्नर, प्लंबर, मॅकेनिक, वेल्डर अशा वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची तारीख 30 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून रेल्वे भरती बोर्डाने परिक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. इच्छुक उमेदवारांनी आणि जर तुमची शैक्षणिक पात्रता नमुद केलेल्या पदांप्रमाणे जर असेल, तर तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता. यासाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण हवे आहे आणि फिटर, टर्नर, प्लंबर, मॅकेनिक, वेल्डरसह वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर तुमचं ITI झालेलं हवं आहे.
advertisement
ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी जम्बो भरती, शेवटची तारीख आली जवळ; इथे करा अर्ज
अधिकाधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वेने प्रसिद्ध केलेली जाहीरात पाहू शकता. 2865 पदांसाठी ही भरती निघाली असून वयाची अट कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 24 इतके आहे. SC, ST, PWD (Persons With Disabilities) आणि महिलांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गासाठी 141 रूपये फी आहे. हे परीक्षा शुल्क सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा असून ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. अद्याप रेल्वेने परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अधिकाधिक माहिती उपलब्ध होईल.
