Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वेमध्ये 80 जागांसाठी विविध पदांसाठी भरती, थेट होणार मुलाखत; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Last Updated:

Konkan Railway Corporation Limited Bharti 2025 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट 2025 मध्ये, काही पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वेचीही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात नोकरी स्थानांसाठी असून, निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वेमध्ये 80 जागांसाठी विविध पदांसाठी भरती, थेट होणार मुलाखत; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वेमध्ये 80 जागांसाठी विविध पदांसाठी भरती, थेट होणार मुलाखत; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी सध्या तुमच्याकडे आहे. कोकण रेल्वेमध्ये इंजिनिअरच्या वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट 2025 मध्ये, तब्बल 80 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वेचीही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात नोकरी स्थानांसाठी असून, निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असलेल्या ह्या भरतीची सुरूवात 1 ऑगस्ट 2025 पासून झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2025 अशी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ऑगस्ट 2025 च्या सुरुवातीला सहाय्यक विद्युत अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई, तांत्रिक सहाय्यक/ईएलई या पदांसाठी एकूण 80 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली. या भरतीचे अर्ज जरीही ऑनलाईन पद्धतीने भरले गेले असले तरीही याची निवड प्रक्रिया मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12, 15, 16 आणि 18 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.
advertisement
उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहितीसाठी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी. सहाय्यक विद्युत अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/ईएलई पदाकरिता इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये किमान 60% गुणांसह पदवी/ डिप्लोमा आणि अनुभव आवश्यक आहे. या पदांसाठी अर्जदाराचे वय जास्तीत जास्त 45 वर्षे असावे. टेक्निकल असिस्टंट/ईएलई पदासाठी कोणत्याही ट्रेड मध्ये आयटीआय आणि अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी अर्जदाराचं वय जास्तीत जास्त 35 वर्षे असावे. मुख्य बाब म्हणजे, अर्जदारांना अर्ज करताना कोणतीही फी भरायची नाहीये. सर्वांना फ्री असणार आहे.
advertisement
एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवुड्स रेल्वे स्टेशनजवळ, सेक्टर-४०, सीवुड्स (पश्चिम), नवी मुंबई असा मुलाखतीचा पत्ता आहे. मुलाखतीला जाताना उमेदवारांनी त्यांचा बायो-डाटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती आणि साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan Railway Recruitment 2025 : कोकण रेल्वेमध्ये 80 जागांसाठी विविध पदांसाठी भरती, थेट होणार मुलाखत; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement