Shilphata Traffic: नाशिकला शिळफाट्यावरून जाताय? थांबा, ही बातमी वाचा; वाहतुकीत झाले मोठे बदल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Shilphata Traffic : ठाण्याच्या शिळफाटावरून तुम्हाला कल्याण- डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. सध्या शिळफाटा मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे.
सर्वाधिक वर्दळीचा रस्ता वाहतुकीसाठी ओळखला जाणारा शिळफाट्यावर कायमच ट्रॅफिक पाहायला मिळते. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सोबतच सध्या विकेंडही आहे. आणि या काळात गणेशभक्त अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ठाण्याच्या शिळफाटावरून तुम्हाला कल्याण- डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहे. सध्या शिळफाटा मार्गावर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने ही ट्रॅफिक वळवण्यात आली आहे.
महापे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना शिळ फाटा ब्रिजवरून कल्याण फाटा- पनवेलमार्गे वळवले आहे. नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांना ब्रिजवरून सोडण्यात येत आहे. तर, शिळ फाटा ब्रिज खालून कमी जड असणार्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. सध्या गणेशोत्सवामुळे अनेक अवजड वाहनांना वेगवेगळ्या महामार्गांवरून बंदी आहे. त्यामुळे अनेक वाहनांना रस्त्याच्या कडेला थांबवलं असून अनेक वाहनांना पर्यायी ठिकाणी त्यांची पार्किंग करण्यात आली होती.
advertisement
शिळफाट्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्यामुळे प्रवाशांनी शक्य तिथे पर्यायी मार्गाचा वापर केला आहे. शिळफाट्याप्रमाणेच ठाण्यातल्याही अनेक मार्गांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. गायमुख घाटात अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणात ये- जा असल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 30, 2025 3:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shilphata Traffic: नाशिकला शिळफाट्यावरून जाताय? थांबा, ही बातमी वाचा; वाहतुकीत झाले मोठे बदल