Thane Municipal Corporation Job: ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी जम्बो भरती, शेवटची तारीख आली जवळ; इथे करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Thane Municipal Corporation Job : ठाणे महानगरपालिकेमध्ये जम्बो भरती आहे, हजारो पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे. लवकरच ठाणे महानगर पालिकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करा. कारण की, अर्जाची शेवटची तारीख फारच जवळ आली आहे.
ठाणे महानगरपालिकेमध्ये जम्बो भरती आहे, हजारो पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे. लवकरच ठाणे महानगर पालिकेमध्ये नोकरीसाठी अर्ज करा. कारण की, अर्जाची शेवटची तारीख फारच जवळ आली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरच सरकारी नोकरीसाठी अर्ज करा. ठाणे महानगर पालिकेमध्ये तब्बल 1773 जागांसाठी नोकरी आहे. ही जम्बो भरती असून नोकरीच्या शोधात असणार्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. चला तर जाणून घेऊया, कोणकोणत्या पदासाठी ठाणे महानग पालिकेमध्ये नोकरीच्या संधी आहेत...
10th- 12th पास असाल तर मिरा- भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी, 358 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज
ठाणे महानगर पालिकेमध्ये, गट क आणि गट ड साठी ही मेगाभरती आहे. यामध्ये, सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्ससह इतर पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची तारीख 11 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख येत्या काही दिवसांतच आहे. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करा. ठाणे महानगर पालिकेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी, पदवीधर, इंजिनिअरिंग, पदवी, GNM, B.Sc, DMLT, M.Sc, B.Pharm अशी आहे. ही शैक्षणिक पात्रता सर्वच पदांना आधारलेली आहे.
advertisement
ठाणे महानगर पालिकेमध्ये तब्बल 65 सेवा असून त्यामध्ये एकूण 1775 पदं रिक्त आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 असून तुम्ही मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज भरायचा असून ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. अद्याप ठाणे महानगर पालिकेने अर्ज निघालेल्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठाणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अधिकाधिक माहिती उपलब्ध होईल. खुला प्रवर्गासाठी या परीक्षेचा अर्ज 1000 रूपये इतका आहे. तर, मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी परिक्षेची फी 900 रूपये इतकी आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायची आहे.
advertisement
महत्वाची बाब म्हणजे, जर माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील तर त्यांना परीक्षा शुल्क माफ असेल. भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्वांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. तर, ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात पाहू शकता.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
August 29, 2025 9:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Municipal Corporation Job: ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी जम्बो भरती, शेवटची तारीख आली जवळ; इथे करा अर्ज


