RRB Group D 2025 Exam: रेल्वेच्या ग्रुप 'डी'च्या परीक्षा केव्हा होणार? असं कराल Hall ticket डाऊनलोड...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
RRB Group D 2025 Exam Dates: गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप 'डी' साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. आता लवकरच त्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे.
अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे लवकरच स्वप्न पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी तरूण वर्गाकडे आता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप 'डी' साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले होते. आता लवकरच त्या उमेदवारांची परीक्षा होणार आहे. अद्याप रेल्वे भरती बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच परीक्षा होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर उमेदवारांकडून लवकरात लवकर परीक्षा घ्या, अशी मागणी केली जात आहे.
8 वी पास असाल तर मिळेल बँकेत जॉब, 165 जागांची जम्बो भरती; इथे करा अर्ज
गेल्या काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या ग्रुप 'डी' साठी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर आता परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. अद्याप रेल्वे भरती बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरात लवकर परीक्षा घेण्याची मागणी सध्या होत आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी ग्रुप 'डी' पदांसाठी अर्ज भरला आहे. त्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट तपासून परीक्षेसाठीचं ओळखपत्र आलं आहे की नाही, हे तपासावं. परीक्षेच्या 10 दिवस आधी उमेदवारांना त्यांचं त्यांचं ओळखपत्र उपलब्ध होईल. परीक्षेच्या चार दिवस आधी उमेदवारांना त्यांचं परीक्षा ओळखपत्र उपलब्ध होईल. रेल्वेकडून 32, 438 पदांसाठी ग्रुप 'डी' साठी नोकरभरती होणार आहे.
advertisement
10th- 12th पास असाल तर मिरा- भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची संधी, 358 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज
ग्रुप 'डी' साठी भरतीच्या माध्यमातून, रेल्वेमध्ये असिस्टंट (एस अँड टी), असिस्टंट (वर्कशॉप), असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज आणि वॅगन, असिस्टंट लोको शेड (डिझेल), असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), असिस्टंट ऑपरेशन (इलेक्ट्रिकल), असिस्टंट पी. वे, असिस्टंट टीएल आणि एसी (वर्कशॉप), असिस्टंट टीएल आणि एसी, असिस्टंट ट्रॅक मशीन, असिस्टंट टीआरडी, पॉइंट्समन बी ट्रॅक मेंटेनर-IV ही पदे भरली जातील. ग्रुप 'डी' साठी घेतली जाणारी परीक्षा एकूण 90 मिनिटांची असेल, जी एकूण 100 मार्कांची असेल. सामान्य विज्ञान आणि गणित या विषयांवरून 25- 25 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र या विषयांवरून 30 मार्कांचे प्रश्न आणि सामान्य जागरूकता (General Awareness) आणि चालू घडामोडी या विषयांवरून 20 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेमध्ये एका चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश मार्क वजा केले जातील. सीबीटीमध्ये गुण सामान्यीकरणाची (Normalization) पद्धत अवलंबली जाईल.
advertisement
108 किलो चांदीचा गणपतीला 2,00,00,000 रुपयांचं सोनं,मुंबईकरांवर जालनेकर ठरले भारी
RRB Group D 2025 परीक्षेचे Timetable कसे तपासायचे-
- सर्वप्रथम तुम्हाला RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या RRB Group D Exam 2025 Timetable च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
- मग तुमच्या स्क्रीनवर वेळापत्रक उघडेल.
- मग तुम्ही परीक्षेचं वेळापत्रक डाउनलोड करून प्रिंटआउट घेऊ शकता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
RRB Group D 2025 Exam: रेल्वेच्या ग्रुप 'डी'च्या परीक्षा केव्हा होणार? असं कराल Hall ticket डाऊनलोड...


