Ganeshotsav 2025: अनोखा गणेश भक्त, दुर्मिळ 2100 बापांच्या मूर्तींचा केला संग्रह, काय आहे खास? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रकाश पुरवार यांचे देखील बाप्पावरती अपार भक्ती आहे आणि म्हणूनच त्यांनी बाप्पांच्या मूर्तीचा संग्रह केलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं अगदी उत्साहाने, आनंदाने आणि भक्तीने स्वागत केलेलं आहे. गणपती बाप्पा म्हणजे सर्वांचं श्रद्धेचं आणि आस्थेचं स्थान. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रकाश पुरवार यांचे देखील बाप्पावरती अपार भक्ती आहे आणि म्हणूनच त्यांनी बाप्पांच्या मूर्तीचा संग्रह केलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे प्रकाश पुरवार यांची गणपती बाप्पावरती अपार श्रद्धा आहे आणि म्हणूनच त्यांनी गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती गोळा करायला सुरुवात केली. गेल्या 21 वर्षांपासून ते मूर्तींचा संग्रह करत आहेत. त्यांच्या पंजोबा, आजोबांकडून त्यांना याची प्रेरणा मिळाली. कारण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची गणपती बाप्पा वरती अगदी मनापासून श्रद्धा होती आणि म्हणूनच त्यांना या मूर्ती गोळा कराव्या असं वाटलं. त्यांच्याकडे गणपती बाप्पाच्या खूप अशा दुर्मिळ मूर्तींचा संग्रह आहे.
advertisement
प्रकाश पुरवार यांच्याकडे तब्बल 2100 अशा गणपतीच्या मूर्तींचा संग्रह आहे. त्यांच्याकडे भारतातील तर मूर्ती आहेतच, त्याचबरोबर त्यांच्याकडे बाहेर देशातील देखील मूर्तींचा संग्रह आहे. यामध्ये नेपाळ, तिबेट, जावा, कंबोडिया, व्हिएतनाम या देशातील मूर्ती यांच्याकडे आहेत. त्यासोबतच त्यांनी विविध गणपती बाप्पाचे चित्र देखील गोळा केलेले आहेत. त्यांच्याकडे इतर मूर्तिकार यांनी काढलेले देखील चित्र आहेत. त्यासोबत त्यांनी स्वतः देखील काही गणपती बाप्पाचे चित्र काढलेले आहेत.
advertisement
प्रकाश पुरवार यांच्याकडे दुर्मिळ अशा गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गणपती बाप्पाचे रूप, प्राचीन मूर्ती तसेच आदिवासी या ठिकाणी असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती संग्रह गोळा केलेला आहे. प्रकाश पुरवार म्हणतात की, मी आता आयुष्यभर हा मूर्तीचा संग्रह करणार आहे. एकदा संग्रह करण्याचा माणसाला नाद लागला की तो आयुष्यभर लागतो आणि ह्या मी मूर्ती गोळा करतो याचा मला खूप आनंद होतो आणि समाधान देखील वाटतं.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 29, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Ganeshotsav 2025: अनोखा गणेश भक्त, दुर्मिळ 2100 बापांच्या मूर्तींचा केला संग्रह, काय आहे खास? Video

