नेमकं काय म्हणाले राऊत?
संजय राऊत यांनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या जी20 शिखर परिषदेवरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जी20 मध्ये आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं, त्यामुळे ते इथे आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच इथे आले होते. जो बायडन यांच्यासोबत केलेला करार, प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता. सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
मराठा आरक्षणावरून निशाणा
दरम्यान मराठा आरक्षणावरून देखील त्यांनी टीका केली आहे. जरांगे पाटील मागे हटणार नाहीत. सरकारला मराठवाड्यातील कॅबिनेटपूर्वी हे सगळं गुंडाळायचं आहे. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नेय, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सर्व सुरू आहे. कालच्या बैठकीचं कोणाला काही पडलं नाही, त्यातून काहीच साध्य झालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याच देखील म्हटलं आहे.